Advertisement

एका रुग्णामुळे पूर्ण बिल्डिंग सील नको - बीएमसी

एखाद्या बिल्डींगमध्ये किंवा सोसायटीमध्ये रुग्ण सापडल्यास ती संपूर्ण सोसायटी किंवा बिल्डिंग सील करण्याची गरज नाही, असं महापालिकेने सांगितलं आहे.

एका रुग्णामुळे पूर्ण बिल्डिंग सील नको - बीएमसी
SHARES
 मुंबई महापालिकेने आता बिल्डिंग सील करण्याचे नियम बदलले आहेत. एखाद्या बिल्डींगमध्ये किंवा सोसायटीमध्ये रुग्ण सापडल्यास ती संपूर्ण सोसायटी किंवा बिल्डिंग सील करण्याची गरज नाही, असं महापालिकेने सांगितलं आहे. घटनास्थळाची परिस्थिती पाहून एक मजला किंवा एक भाग सील करण्याविषयी अधिकारी निर्णय घेऊ शकतात, असं पालिकेने म्हटलं आहे.


बहुमजली इमारतीमध्ये रुग्ण सापडल्यास रुग्णाचं घर आणि संबंधित क्षेत्राचं निर्जंतुकीकरण केलं जाईल. शिवाय सोसायटीशी चर्चा करुन ते क्षेत्र सील केलं जाईल, असं ठरवण्यात आलं आहे. सोसायटीला कंटेन्मेंट झोनच्या नियमांची माहिती दिली जाईल आणि याची अंमलबजावणी सोसायटीकडून केली जाणं अपेक्षित आहे.


एखाद्या मोठ्या वसाहतीत रुग्ण सापडल्यास फक्त ती इमारत सील केली जाईल, असा बदल महापालिकेने एप्रिलमध्ये केला होता. तर कंटेन्मेंट झोनमधील छोटे छोटे भाग मोकळे करुन यंत्रणेकडून त्यावर नजर ठेवली जाईल, असा बदल नवे आयुक्त इक्बाल चहल यांनी गेल्या आठवड्यात केला होता. परिणामी मुंबईतील कंटेन्मेंट झोनची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. सोमवारी एकूण ६७४ कंटेन्मेंट झोन आणि १७६७ सील केलेल्या इमारती होत्या.

हेही वाचा -

ठाण्यातील कंटेन्मेंट झोनची लिस्ट, संपूर्ण तपशीलासह...

महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा, देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारकडे मागणी





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा