Advertisement

55 दिवस मुंबईकरांना पुरेल एवढा पाणीसाठाच शिल्लक - पालिका

यंदा पाऊस वेळेत दाखल झाला नसला तरी मुंबईकरांना चिंता करण्याचं काहीचं कारण नाही.

55 दिवस मुंबईकरांना पुरेल एवढा पाणीसाठाच शिल्लक - पालिका
(File image)
SHARES

यंदा पाऊस वेळेत दाखल झाला नसला तरी मुंबईकरांना चिंता करण्याचं काहीचं कारण नाही. कारण मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आणि तलावामध्ये जुलै अखेरीस पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक आहे.

उन्हाळ्यात अनेकदा मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत होता. परंतु यंदा मागच्या तीन वर्षापेक्षा पाणीसाठा अधिक शिल्लक आहे. पुढचे 55 दिवस पाणी मुंबईकरांना पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

मोडकसागर – 46639 दशलक्ष लिटर

तानसा – 10859 दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा – 44790 दशलक्ष लिटर

भातसा – 104210 दशलक्ष लिटर

विहार – 3645 दशलक्ष लिटर

तुलसी – 2319 दशलक्ष लिटर

2021 मध्ये या दिवसाच्या तुलनेत सध्याचा साठा जास्त आहे, जेव्हा तो 12.84 टक्के होता.

मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या तलावांमधून BMC रहिवाशांना दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करते.

अलिकडच्या वर्षांत, नागरी संस्थेने पावसाचे पाणी साठवणे, बोअरवेल खोदणे, डिसॅलिनेशन इत्यादीसारख्या प्रयोगांसह पाण्याचे अतिरिक्त स्रोत शोधणे सुरू केले आहे. परंतु, पाऊस हा नेहमीच शहरासाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत राहिला आहे. बीएमसी दरवर्षी १ ऑक्टोबरला तलावातील पाण्याच्या पातळीचा आढावा घेते.

मान्सूनच्या अनिश्चितपणामुळे मे आणि जून महिन्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागायचा. परंतु गेल्यावर्षी समाधानकारक राज्यात पाऊस झाल्याने यंदा पाणी कपात करण्यात आलेली नाही.

मुंबईत पाण्याची समस्या निर्माण झाल्यास त्यासाठी पालिकेकडून प्रकल्प चालविण्यात येणार आहे. मनोरी येथील इस्रायली तंत्रज्ञानाच्या प्रस्तावित खारे पाणी गोडे करणे प्रकल्पात सुरुवातीला 200 दशलक्ष लिटर करण्याचं उद्दिष्ट आहे. तर प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर दररोज 400 दशलक्ष लिटरपर्यंत पाणी गोड करता केलं जाणार आहे.



हेही वाचा

वांद्रामध्ये इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

मान्सून रेंगाळला, महाराष्ट्रात 12 जूननंतर होणार दाखल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा