Advertisement

मान्सून रेंगाळला, महाराष्ट्रात 12 जूननंतर होणार दाखल

राज्यात आता तो १२ ते १३ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे.

मान्सून रेंगाळला, महाराष्ट्रात 12 जूननंतर होणार दाखल
SHARES

राज्यात आता तो १२ ते १३ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी तो ७ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. पण मान्सून गोव्याच्या सीमेवर रंगाळला आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये आगामी पाच दिवस मान्सूनपूर्व पावसाचा जोर राहणार आहे. मध्य प्रदेशासह विदर्भात उष्णतेची लाट आहे. बिहार, आसाम आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस होत आहे.

मान्सून कर्नाटकमधील कारवार, चिकमंगळूर, बंगळुरू, धर्मापुरी व गोव्याच्या सीमेदरम्यान रेंगाळला असून वातावरणीय बळकटी मिळाल्यानंतर तो आगेकूच करू शकतो. नाशिक जिल्ह्यात १२ जूनदरम्यान हलक्या पावसाची सुरुवात होऊ शकते. ८ व ९ जूनपासून कोकण, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा करावी लागत असून दोन ते तीन दिवसांत जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. सोमवारी मालेगाव तालुक्यात दुपारी काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.

सध्या विदर्भात उष्णतेची लाट सुरू असून गोंदियात सर्वाधिक ४५.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे.

राज्यात जळगाव, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा नागपूर वेधशाळेने दिला आहे.



हेही वाचा

पावसाळ्यानिमित्त MMRDA कडून कंट्रोल रुम्सची स्थापना, 'इथे' करा संपर्क

1 जून ते 31 जुलै दरम्यान मासेमारीवर बंदी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा