SHARE

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंऐवजी त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्याचा विचार करणाऱ्या महापालिकेने पुन्हा एकदा वस्तूच देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षांसाठी निविदा पूर्ण झाल्या असल्यामुळे आता वस्तू देऊन पुढील शैक्षणिक वर्षांपासून पैसे देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या सभेत घेण्यात आला आहे.


सद्यस्थिती काय?

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांना २७ शालेय वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. परंतु नवीन शैक्षणिक वर्षांपासून मुलांना वस्तूंऐवजी पैसे देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने महापौरांच्या अध्यक्षतेखालील गटनेत्यांच्या सभेपुढे ठेवला होता. परंतु या प्रस्तावावर सर्वच सदस्यांनी पैसे देण्यास विरोध दर्शवला.


निविदा प्रक्रिया सुरू

त्यावर प्रशासनाच्यावतीने, येत्या शैक्षणिक वर्षासाठी निविदा प्रक्रिया सुरु असल्याचं सांगितलं. त्यामुळे या निविदा प्रक्रिया सुरु असल्यामुळे येत्या वर्षांत आपण वस्तू देऊ आणि त्यापुढील वर्षांत मुलांना वस्तूंऐवजी पैसे देण्याचा विचार केला जाईल, असं आश्वासन आयुक्त अजोय मेहता यांनी गटनेत्यांच्या सभेत दिल्याचं सांगितलं.

त्यानुसार येणाऱ्या शैक्षणिक वर्षां विद्यार्थ्यांना गणवेश, बॅग, वाॅटरबॅग, पुस्तकं इ. २७ वस्तूच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या