Advertisement

डेंग्यू, मलेरियाच्या प्रतिबंधासाठी १० हजार टायर्सची विल्हेवाट


डेंग्यू, मलेरियाच्या प्रतिबंधासाठी १० हजार टायर्सची विल्हेवाट
SHARES

मुंबईत पावसाळ्यात उद्भभवणाऱ्या डेंग्यू आणि मलेरिया आजाराच्या प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या वस्तूंचा नायनाट करण्याची धडक मोहीम मुंबई महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार फेकून दिलेले टायर्स ताब्यात घेत मागील ६ महिन्यांत महापालिकेने तब्बल १० हजार टायर्सची विल्हेवाट लावली आहे.


महापालिका दक्ष

याच अनुषंगाने महापालिकेने १ जानेवारी ते ३० जून २०१८ या ६ महिन्यांच्या कालावधीत १० हजार ८७० टायर्स हटवले अाहेत. टायर्स व्यतिरिक्त पावसाचे वा इतर पाणी साचू शकेल, असे चहाचे कप, कागदी पेले, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, बाटलीचं झाकण, कुड्यांखालील ताटल्या, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेलं प्लास्टिक इ. ३ लाख ८४ हजार ९७७ छोट्या-मोठ्या वस्तूही हटविल्या आहेत.


नागरिकांना आवाहन

साचलेल्या काही थेंब पाण्यातही डेंगी (डेग्यू) व हिवतापा (मलेरिया)च्या प्रसारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे नागरिकांनी डास प्रतिबंधाबाबत आवश्यक ती काळजी घेऊन महापालिकेच्या किटकनाशक विभागाला सहाय्य करावं, असं आवाहन महापालिकेचे किटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी केलं आहे.


अाठवड्याभरात डासांची उत्पत्ती

साचलेल्या पाण्यात डासांची मादी एकावेळी सुमारे १०० ते १५० अंडी घालते. या अंड्यांमधून डास उत्पन्न होण्यास साधारणपणे आठवड्याभराचा कालावधी लागतो. हे लक्षात घेता, दर आठवड्यात किमान एकदा तरी आपल्या सोसायटीच्या व कार्यालयाच्या परिसराची तपासणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचं आवाहन महापालिकेने केलं आहे.

गेल्या ६ महिन्यांत महापालिकेच्या 'के पूर्व' विभागात सर्वाधिक म्हणजे १,४९३ टायर्स हटविण्यात आले आहेत. तर त्या खालोखाल 'आर उत्तर' विभागातून १,२४८ व 'एल' विभागातून १,२११ टायर्स हटविण्यात आले आहेत. तर सर्व २४ विभागातून १० हजार ८७० टायर्स हटविण्यात आले आहेत.



हेही वाचा-

लेप्टोने आतापर्यंत घेतले तीन बळी

बेवारस भंगार गाड्यांचा लिलाव लवकरच



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा