Advertisement

लालबागचा राजा मंडळाला ३५ लाखांचा दंड


लालबागचा राजा मंडळाला ३५ लाखांचा दंड
SHARES

गणेशोत्सव काळात 'लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'ने रस्त्यांवर खड्डे खोदल्यामुळे मुंबई महापालिकेनं या मंडळाला पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. या मंडळाने मागच्या वर्षी गणेशोत्सवात खड्डे बुजवले असले तरी अनेक गणेशोत्सवात खड्ड्यांचे पैसे शिल्लक असल्यानं पालिकेनं व्याजासकट सुमारे ३५ लाखांचा दंड ठोठावला आहे.


पालिकेने बजावली नोटीस 

गणेश चतुर्थीनंतर महापालिकेनं गणेशोत्सवादरम्यान ज्या मंडळांनी रस्त्यावर खड्डे करून ते बुजवले नाहीत, अशा मंडळाची यादी तयार केली. लालबागमधील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळानं २०७ खड्डे बुजवले नसल्याचं महापालिकेच्या तपासणीत आढळून आलं होतं. 


पालिकेने कारवाईचा बडगा उगारला

पालिकेने लालबाग मार्केटमधील ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला तब्बल ४ लाख ८६ हजार रुपये, तर गणेशगल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाला ४ लाख १४ हजार रुपये दंड केला होता. या दोन्ही मंडळाबरोबर योग्य पद्धतीने खड्डे न बुजवणाऱ्या लालबाग आणि परळ परिसरातील अन्य १८ मंडळांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून या मंडळांवरही पालिकेने नोटीस बजावली होती. त्यानंतर हे खड्डे लालबाग राजा मंडळाने भरल्याने दंड माफ करण्यात आला होता. पण जुना दंड या मंडळाने अद्याप भरला नव्हता.


यामुळे 'ही' नोटीस बजावली

लालबागचा राजा मंडळाला बजावण्यात आलेल्या नोटीसबाबत एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त किशोर गांधी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागील गणेशोत्सव काळातील खड्ड्यांप्रकरणी नसून त्या आधीच्या गणेशोत्सव काळातील जी थकित रक्कम प्रलंबित आहे, त्याप्रकरणी ही नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या नियमानुसार जर खड्डा बुजवला नाही तर प्रत्येक खड्ड्यासाठी दोन हजार रुपये आकारला जातो. याप्रमाणे महापालिकेनं दंड आणि व्याजाच्या रकमेसह सुमारे ३५ लाखांची रक्कम भरण्याबाबत नोटीस पाठवली आहे, असं म्हटलं आहे.


हेही वाचा - 

रस्त्याचे काम रखडल्याने दुकानदार हैराण

लालबागचा राजा, गणेश गल्लीच्या गणपती मंडळांनी खोदले ४५० खड्डे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा