Advertisement

रस्त्याचे काम रखडल्याने दुकानदार हैराण


रस्त्याचे काम रखडल्याने दुकानदार हैराण
SHARES

मुंबईत रस्त्यांवरील ट्रॅफिक, कचरा आणि खड्डे या समस्या काही नवीन नाहीत. दादर पश्चिमेकडेही अशीच काहिशी स्थिती आहे. केशवसूत उड्डाण पुलाच्या बाजूचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. पण महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या खोदकामामुळे या परिसरात येणारे नागरिक आणि दुकानदार दोघांनाही सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे.



केशवसूत उड्डाणपूल परिसरात कचऱ्याचे ढीग नेहमीच पडलेले दिसतात. पण या ढिगांसोबतच मागील १५ दिवसांपासून महापालिकेकडून खोदकामही सुरू आहे. या खोदकामामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.    

या ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने पाईपलाईन दुरूस्तीचे काम पालिकेच्या जी/ उत्तर विभागाने खासगी कंत्राटदराला दिले आहे. या घटनेला १५ दिवस उलटून गेले आहेत. तरीदेखील नक्की पाईपलाईन कुठे फुटली?, याचा नेमका अंदाज या कंत्राटदाराला आलेला नाही.


या वेळकाढू कामाचा त्रास येथील सर्व दुकानदारांना होत आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजले की अचानक खड्ड्यांतील पाण्याची पातळी वाढते. हे पाणी दुकानात शिरत असल्याने दुकानदारांचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे सध्या या परिसरातील विक्रेते त्रस्त आहेत. घाण पाण्यात आणि कचऱ्यात कसा व्यवसाय करायचा? हा मोठा प्रश्न दादर विभागातील या व्यापाऱ्यांना पडला आहे.

काही व्यापाऱ्यांनी स्थानिक नगरसेविकेकडे तक्रार केली असून अजूनही तेथे दुर्लक्ष होत असल्याने व्यापारी नाराज आहे. पादचाऱ्यांना तर या ठिकाणहून चालणे देखील मुश्किल झाले आहे. वाहनांना तर प्रवेश बंद केलाच आहे, पण काम मात्र संथ गतीने सुरू आहे. तसे पाहता हे काम अगदी एक दोन दिवसात होण्यासारखे आहे. पण पालिकेचे वेळकाढू धोरण, कंत्राटदरांचा निकृष्ट तसेच ढिसाळ कामाचा दर्जा, या सर्वाला जबाबदार असल्याचे मत येथील व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.



'आम्ही सर्व प्रकारचे कर भरतो. आता तर जगातील सर्वाधिक जीएसटी आम्ही भरतो. असे असताना आम्हाला मूलभूत सुविधा देखील व्यवस्थित मिळत नाहीत. आम्ही यापुढे शांत बसणार नाही. काम लवकरात पूर्ण न झाल्यास पालिकेच्या जी/ उत्तर विभागावर धडक मोर्चा घेऊन जाऊ', असे म्हणत दुकानदारांनी संताप व्यक्त केला.


या प्रकाराची चौकशी करून लवकरात लवकर काम पूर्ण करून देऊ.

रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त, जी उत्तर विभाग, पालिका



हेही वाचा - 

लालबागचा राजा, गणेश गल्लीच्या गणपती मंडळांनी खोदले ४५० खड्डे



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा