Advertisement

लालबागचा राजा, गणेश गल्लीच्या गणपती मंडळांनी खोदले ४५० खड्डे


लालबागचा राजा, गणेश गल्लीच्या गणपती मंडळांनी खोदले ४५० खड्डे
SHARES

गणेशोत्सवात उत्सव मंडळांनी मंडपासाठी खोदलेल्या खड्डयांप्रकरणी महापालिकेच्या एफ-दक्षिण विभागाने १३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दंडात्मक कारवाईची नोटीस जारी केली आहे. यामध्ये लालबागचा राजा उत्सव मंडळाला २४३ खड्डे केल्याप्रकरणी ४ लाख ८६ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. प्रत्येक खड्डयांसाठी महापालिकेने २ हजार रुपयांचा दंड  आकारला आहे.


१३ मंडळांना १२ लाखांचा दंड

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यासर्व गणेशोत्सव मंडळांना महापालिकेच्यावतीने तसेच पोलिसांच्यावतीने परवानगी देताना खड्डे न खोदण्याची अट घालण्यात आली होती. खड्डे खोदले गेल्यास ते त्वरीत बुजवले जावेत, अशाही प्रकारच्या अटीचा समावेश होता. जर हे खड्डे बुजवले न गेल्यास संबंधित मंडळाला प्रत्येक खड्डयांसाठी २ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले होते. 

त्यानुसार एफ-दक्षिण विभागातील परळ, शिवडी, लालबाग व काळाचौकी आदी भागातील १३ मंडाळांना खड्डे खोदल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. यासर्व १३ मंडळांकडून खड्डयाप्रकरणी १२ लाख ९४ लाखांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. 


खड्डयांनी रस्ते, मैदान खराब

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्या नावाने ही नोटीस जारी करण्यात आली आहे, तर गणेश गल्लीच्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे स्वप्नील परब यांच्या नावे ही नोटीस जारी करण्यात आली आहे. 

लालबागचा राजा पाठोपाठ गणेश गल्लीच्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने २०७ खड्डे खणून रस्ते तसेच मैदान खराब केले आहेत. याप्रकरणी या मंडळाला ४ लाख १४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. महापालिका परिमंडळ २ चे उपायुक्त तसेच एफ-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त यांच्या कार्यालयाच्यावतीने ही दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.


एफ-दक्षिण विभागाने कारवाई केलेल्या १३ मंडळांपैकी निवडक मंडळांची नावे :

सार्व. गणेशोत्सव मंडळांची नावे
मंडपासाठी खोदलेले खड्डे
दंडात्मक कारवाई
लालबागचा राजा सार्व. उत्सव मंडळ
243
4 लाख 86 हजार रुपये
लालबाग सार्व. उत्सव मंडळ, गणेशगल्ली
207
4 लाख 14 हजार रुपये
चिंचपोकळी सार्व. उत्सव मंडळ
34
68 हजार रुपये
बाळगोपाळ सार्व मंडळ, त्रिवेणीसदन, करीरोड
24
48 हजार रुपये
परळ, नरे पार्क सार्व. गणेशोत्सव मंडळ
23
46 हजार रुपये
परळ सार्वजनिक उत्सव मंडळ
21
42 हजार रुपये
लालमैदान सार्व. गणेशोत्सव मंडळ, परळ
17
34हजार रुपये
काळाचौकी जिजामातानगर सार्व. गणेशोत्सव मंडळ
15
30 हजार रुपये



हे देखील वाचा -

मुंबईतील निम्म्या गणेशोत्सव मंडपांना परवानगीच नाही



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा