Advertisement

मुंबईचा राजा यंदा सुवर्ण मंदिरात विराजमान होणार


मुंबईचा राजा यंदा सुवर्ण मंदिरात विराजमान होणार
SHARES

मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश गल्लीतील लालबाग गणेशोत्सव मंडळाचा गणपती यंदा सुवर्ण मंदिरात विराजमान होत आहे. गणेश गल्लीचा गणपती नेहमीच उंचीसाठी नावाजला जातो. यावेळेस तामिळनाडूतील वेल्लूर येथील श्रीपुरम सुवर्ण मंदिराच्या आकर्षक सजावटीची त्यात भर पडणार आहे.



महत्त्वाचे म्हणजे लालबाग गणेशोत्सव मंडळ या वर्षी ९० व्या वर्षांत पदार्पण करत असल्याने यंदाचा गणेशोत्सव मंडळासाठी खास असणार आहे. यामुळेच मंडळाने १९८५ सालच्या मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती विराजमान करून मूर्तीकार दि. दिनानाथ वेलिंगकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळची मूर्ती मात्र दि. विजय खातू यांनी बनवलेली आहे.



मूर्तीकार दि. दिनानाथ वेलिंगकर यांच्या कलागुणांमुळेच गणेश गल्लीचा गणपती भाविकांच्या आवडीचा बनला. त्यामुळे मंडळाने पुढचे दशक 'वेलिंग दशक' म्हणून साजरे करण्याचे ठरवले असून पुढची दहा वर्षे मंडळ वेलिंगकरांनी साकारलेल्या दहा निवडक मूर्तींच्या प्रतिकृती विराजमान करणार आहे.



लालबाग गणेशोत्सव मंडळ दरवर्षी सजावटीसाठी विविध मंदिराची प्रतिकृती साकारते. यावेळेस तामिळनाडूतील वेल्लूर येथील प्रसिद्ध श्रीपुरम सुवर्ण मंदिराची भव्यदिव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. आकाराच्या बाबतीतही मूळ मंदिराच्या तुलनेत ७० टक्के आकाराचे मंदिर उभारण्यात आम्हाला यश आले आहे. ज्या भक्तांना वेल्लूरच्या सुवर्ण मंदिरात जायची इच्छा आहे, त्यांनी आवर्जून येथे दर्शनाला यावे.
- अमन विधाते, सेट डिझायनर



हे देखील वाचा -

'या' बाप्पांसाठी काढला 5 कोटींचा विमा!

पर्यावरण संवर्धनाचा 'ट्री गणेशा'


 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा