Advertisement

'या' बाप्पांसाठी काढला 5 कोटींचा विमा!


'या' बाप्पांसाठी काढला 5 कोटींचा विमा!
SHARES

मुंबईत सर्वत्र गणेशोत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे. अनेक मंडळांच्या बाप्पांचे आगमनही झाले आहे. त्याचप्रमाणे अंधेरीच्या राजाची स्थापना मोठ्या धूमधडाक्यात झाली आहे. या मंडळाने यंदा राज्यातील प्रसिद्ध बल्लाळेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. एवढेच नाही, तर या गणेश मंडळाने यंदा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 5 कोटींचा विमा काढला आहे!


विम्यात भक्तांचाही समावेश

दरवर्षी हे मंडळ बाप्पाच्या सजावटीसाठी लाखोंचा खर्च करते. अभिनेत्यांसह अनेक भक्त अगदी लांबून या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी आवर्जून येतात. त्यामुळे नैसर्गिक संकटांमुळे होणारे संभावित नुकसान आणि हल्ले यासह इतर धोके टाळण्यासाठी हा विमा उतरवला असल्याची माहिती मंडळाने दिली आहे. यामध्ये फक्त मंडळातल्या सदस्यांचाच नाही तर भक्तांचाही समावेश आहे. नॅशनल इंश्युरन्स लिमिटेड या सरकारी विमा कंपनीने हा विमा केला आहे. यात बाप्पांना भेट दिल्या जाणाऱ्या आणि सजवटीसाठी लावलेल्या दागिन्यांचाही समावेश आहे. या विम्याचा प्रीमियम 90 हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे.

या मंडळाने गेल्या वर्षी दीड कोटींचा विमा उतरवला होता. पण यावर्षी वाढ करून 5 कोटी रुपये एवढा केला आहे.हेही वाचा - 

मुंबईच्या बाप्पांची जम्मू-काश्मीर वारी!

गणपतीसाठी तयार होत आहेत खास 'इको फ्रेंडली' मखर!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा