Advertisement

मुंबईच्या बाप्पांची जम्मू-काश्मीर वारी!


मुंबईच्या बाप्पांची जम्मू-काश्मीर वारी!
SHARES

लोकमान्य टिळकांनी सामाजिक ऐक्य प्रस्थापित व्हावं म्हणून गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचं इतिहास सांगतो. मात्र ही गोष्ट आता फक्त इतिहासच राहिली आहे की काय अशीच परिस्थिती आपल्या आसपास दिसून येते. सामाजिक ऐक्य तर लांबच, उलट वेगवेगळ्या गणेश मंडळांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा आणि प्रसंगी भांडणं दिसून येतात. मात्र या सर्व नकारात्मक परिस्थितीमध्येही काही सामाजिक घटक गणेशोत्सवाचं हेच मूळ तत्व जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातल्याच एक म्हणजे इशरदीदी!


दहा दिवसांचा उत्सव आणि उत्साह!

गेल्या वर्षीपासून इशर दीदी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतल्या कुर्ला परिसरातून मूर्तीकार उदय राणे यांच्या कडून त्या जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये गणेश मूर्ती घेऊन जातात. आणि तिथल्या लोकांसोबत, सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत दहा दिवस उत्सव साजरा करतात.

आमचे हे दुसरे वर्ष आहे. 10 दिवस आम्ही मोठ्या उत्साहात बाप्पाचे पूजन करतो. जवानांचे मनोबल वाढावे हा या मागील मुख्य उद्देश आहे.

इशरदीदी, उपाध्यक्ष, शिवदुर्गा भैरव मंदिर ट्रस्ट


तणावातही आनंदी वातावरण...

पूंछसारख्या संवेदनशील परिसरात, जिथे मृत्यूचं सावट 24 तास पसरलेलं असतं, अशा प्रकारे 10 दिवस उत्सव साजरा करणं ही वाटते तितकी सोपी बाब नाही. मात्र आपल्या जवानांचं मनोबल वाढावं आणि सामाजिक एकोपा आणि शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी इशर दीदींचा हा उपक्रम नक्कीच मोलाची भूमिका पार पाडू शकतो.

जम्मू रेल्वे स्टेशनवर मूर्ती पोहोचताच शिवदुर्ग भैरव मंदिर ट्रस्टचे कार्यकर्ते आणि लष्कराचे जवान ही मूर्ती सुरक्षितरीत्या पूंछला नेऊन तिथे तिची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.


हेही वाचा

यंदाचा गणेशोत्सव ठरणार जगातील सर्वात मोठा महोत्सव


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा