यंदाचा गणेशोत्सव ठरणार जगातील सर्वात मोठा महोत्सव

  Mumbai
  यंदाचा गणेशोत्सव ठरणार जगातील सर्वात मोठा महोत्सव
  मुंबई  -  

  गणेशोत्सवाच्या 125 व्या वर्षानिमित्त विदेशी पर्यटकांना या महोत्सवाची जवळून ओळख व्हावी, म्हणून खास पावलं उचलण्यात आली आहेत. तसंच, गणेशोत्सवानंतर `दुबई शॉपिंग फेस्टिव्हल`च्या धर्तीवर `मुंबई मेला` या शॉपिंग फेस्टिव्हलचीही तयारीही सुरू झाली आहे.

  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे या महोत्सवाचे आयोजन होणार असून पर्यटन, रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत अधिकाऱ्यांना नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.


  परदेशी पर्यटकांसाठी खास काय?

  • पर्यटकांसाठी मोठ्या व्यासपीठाची उभारणी
  • एकाच वेळी 200 पर्यटकांना मिळणार लाभ
  • पर्यटकांना सुरक्षित प्रवासाची आणि दर्शनाची खास व्यवस्था
  • पासेस वितरणासाठी विशेष व्यवस्था
  • वाहतुकीबाबत एअरबीएनबी या कंपनीची मदत
  • तंबू उभारणी आणि स्वच्छतेची जबाबदारी मुंबई महापालिकेवर
  • अन्य सुविधांची जबाबदारी पर्यटन विभागाकडे
  • महापालिकेत स्वतंत्र कक्षाची उभारणी


  दुबईप्रमाणेच आता `मुंबई मेला`ची धूम

  गणेशोत्सवाबरोबरच मुंबई मेला या शॉपिंग फेस्टिव्हलचीही तयारी सुरू झाली असून गणेशोत्सवानंतर दुबईप्रमाणेच मुंबईतही शॉपिंगची क्रेझ असणाऱ्यांची गर्दी होणार आहे. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा मोठा उपक्रम असेल.

  तसेच, मलबार हिल येथे पर्यटकांना आकर्षण म्हणून एक वॉकिंग पूल बनविण्याची संकल्पनाही पर्यटनमंत्री रावल यांनी मांडली. तसेच, जानेवारीमध्ये जर्मनीचे एक शिष्टमंडळ मुंबईत येणार असून त्यासाठी तयारी करण्याचे निर्देशही त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

  या बैठकीत मुंबईतील पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे  अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, व्यस्थापक मोषमी कोसे, सहाय्यक पोलीस आयुक्त रविकांत बुवा यांच्यासह बृहन्मुंबई महानगपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.