पर्यटकांना मिळणार परवडणारी निवासव्यवस्था

  Mumbai
  पर्यटकांना मिळणार परवडणारी निवासव्यवस्था
  मुंबई  -  

  स्थानिकांच्या मदतीने राज्यातील पर्यटनस्थळी परवडणाऱ्या दरात निवासव्यवस्था देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन खात्याने एअरबीएनबी या हॉस्पिटॅलिटी कंपनीसोबत मंगळवारी सामंजस्य करार केला. हा कार्यक्रम सोमवारी वानखेडे स्टेडियम येथे झाला.

  एअरबीएनबीच्या मदतीने राज्य सरकार महाराष्ट्रातील घरगुती निवास व्यवस्थांना जागतिक व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवाय, राज्यात फारशा परिचित नसलेल्या पर्यटन स्थळांची महितीही देणार आहे. एअरबीएनबीने 3,500 घरे आणि वैशिष्ट्यपूर्ण निवासव्यवस्था असलेला देशातील पहिला 'होम शेअरिंग क्लब' मुंबईत स्थापना केला आहे. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आयुक्त नितीन गद्रे आणि एअरबीएनबीचे भारताचे व्यवस्थापक अमनप्रीत बजाज उपस्थित होते.

  जगभरातील पर्यटकांनी महाराष्ट्रात यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्रात पर्यटनाची उत्तम ठिकाणे आहेत. चिखलदरा, महाबळेश्वर, कोकण किनारपट्टीला लाभलेला समुद्र किनारा, गड, किल्ले महाराष्ट्राचे वैभव आहेत. पर्यटकांना या पर्यटनस्थळांचा जवळून अनुभव घेण्याची इच्छा असते. म्हणजेच एखाद्याला किल्ल्यावर रहायचे असेल, तर तेथे तंबू बांधून राहण्याचा अनुभव एअरबीएनबी तुम्हाला देईल. समुद्राशेजारील घरात राहायची व्यवस्था केली जाईल. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यांसाठी आम्ही 2017 हे वर्ष 'व्हिजिट महाराष्ट्र' म्हणून जाहीर केले आहे. राज्यात घरगुती निवासव्यवस्थेचे जाळे तयार करणे आणि घर मालकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारणे हा आमचा उद्देश आहे.
  - जयकुमार रावल, पर्यटनमंत्री

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.