Advertisement

गणपतीसाठी तयार होत आहेत खास 'इको फ्रेंडली' मखर!


SHARES

अवघ्या काही दिवसांवरच गणेशोत्सव हा सण येऊ घातला आहे. सगळीकडेच लाडक्या गणपती बाप्पासाठीची सजावट, तयारी पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून लोकांचा कल इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती म्हणजेच पर्यावरणाला हानी होणार नाही अशा शाडूच्या मातीच्या मूर्तीला जास्त पसंती मिळताना दिसू लागली आहे. त्यातच आता बाप्पासाठी इको फ्रेंडली मखर ही सध्या चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

नानासाहेब शेंडकर यांनी सर्वांसाठी पुठ्ठ्यांचे मखर हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ज्यात चक्क कागदापासून ते अगदी सुंदर आणि टिकणारे मखर बनवून देतात. नानासाहेब यांनी २००१ साली 'उत्सवी' ही संस्था स्थापन केली. ही संस्था गेल्या १७ वर्षांपासून पर्यावरणपूरक कागदी पुठ्ठ्यांचे फोल्डिंग मखर तयार करत असून त्याचा प्रचार व प्रसार करीत आहेत.

नानासाहेब शेंडकर यांनी स्वतः जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मधून शिक्षण पूर्ण केले असून ते गेले ४५ वर्ष जाहिरातक्षेत्र, चित्रपट आणि नाट्यक्षेत्रांमध्ये महत्त्वाची कामगीरी करत आहेत. स्वतःच्या थर्माकोलच्या कारखान्याला आग लागल्यानंतर थर्माकोलमुळे होणारा त्रास लक्षात आल्यावर त्यांनी तो कारखाना बंद करून पर्यावरणाला अनुकूल मखरांचे संशोधन करून पुठ्ठ्याचा पर्याय शोधला.

घरगुती गणपतीबरोबरच मंडळांच्या मोठया गणपतींसाठीही ते मखर बनवू लागले. सर्वसामान्यांना परवडावे म्हणून २५० ते अगदी ३००० पर्यंत हे मखर उपलब्ध करून दिले. सार्वजनिक मंडळाच्या भव्य सजावटीसाठी यावर्षी उत्सवी संस्थेने २४ फूट उंच सिद्धिविनायक पॅलेस कागदी पुठ्ठ्यांमध्ये साकारलेला आहे. या मखरांची मागणी भारतातच नव्हे तर, जगभरातून वाढत आहे. आपल्यासारखे पुठ्ठ्यांचे मखर इतरांनाही करता यावे, म्हणून गेल्या वर्षीपासून नानासाहेब लहान मुलांना आणि मंडळांच्या मुलांनाही शिकवत आहेत.



हेही वाचा

पेपर गणेश मूर्ती पर्यावरणाला हानीकारक?


 डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा