पेपर गणेश मूर्ती पर्यावरणाला हानीकारक?

  Mumbai
  पेपर गणेश मूर्ती पर्यावरणाला हानीकारक?
  मुंबई  -  

  अवघ्या काही दिवसांत गणपती बप्पांचं आगमन होणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक गणपती मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. मात्र गणेशभक्तांनी मातीच्या मूर्तींनाच प्राधान्य द्यावं असं आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केलं जात आहे.

  पीओपीच्या मूर्तींपेक्षा मातीच्या मूर्ती लगेच विरघळत असल्यामुळे पर्यावरण पूरक मानल्या जातात. मात्र अंधेरीत रहाणाऱ्या 38 वर्षीय रोहित वसते यांनी थेट न्यूजपेपर आणि व्हाईटिंग क्ले यांचा वापर करुन गणेश मूर्ती साकारल्या आहेत. या मूर्ती पर्यावरणाला अधिक पूरक असल्याचा दावा वसते यांनी केला आहे. पर्यावरणप्रेमींनी मात्र हा दावा खोडून काढला आहे.

  पेपरच्या सहाय्याने बनवलेला गणपती पूर्णपणे इको फ्रेंडली आणि कमी खर्चात बनवला जातो. शिवाय या मूर्ती आकर्षकही असतात. वर्षभर आधीपासूनच याची तयारी सुरु करावी लागते.

  रोहित वसते, मूर्तीकार

  पेपरपासून गणपतीची एक मूर्ती बनवायला 10 दिवसांचा कालावधी लागतो. यंदाच्या वर्षी वसते यांनी 330 मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

  पेपर गणपती हा पाण्यातल्या माशांसाठी हानीकारक आहे. पेपर तुकड्याने विरघळतो. हे तुकडे खाद्य म्हणून खाणाऱ्या माशांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यासाठी वापरलेले केमिकलयुक्त रंग पाणी दूषित करतात. तसेच पेपर पाण्यातल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतात.

  सुभाष राणे, अध्यक्ष, गोविंद नगर एएलएम

  पर्यावरणप्रेमींनी अशा मूर्तींना विरोध केला असला, तरी याचा माशांवर किंवा पाण्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याचा दावा रोहित वसते यांनी केला आहे. त्यामुळे नक्की या मूर्ती हानीकारक आहेत किंवा नाहीत, याविषयी गणेशभक्तांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.  हेही वाचा

  चाकरमान्यांका बाप्पा पावलो, गणेशभक्तांना टोलमाफी


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.