मुख्यमंत्री म्हणताहेत 'नद्या वाचवा'!

 Mumbai
मुख्यमंत्री म्हणताहेत 'नद्या वाचवा'!
Mumbai  -  

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या मिठी नदीमध्ये होणारं प्रदूषण हा चर्चेचा विषय ठरला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रातल्या नद्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'रिव्हर मार्च' संस्थेच्या सदस्यांना दिले. 'रिव्हर मार्च'चं नदी संवर्धनाचं काम कौतुकास्पद असून, या कामामुळे नद्या वेगाने वाहू लागतील', असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.मुंबईतल्या नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर मार्चचा पुढाकार

मुंबईतील मिठी नदी, ओशिवरा नदी, पोईसर नदी आणि दहिसर नदीया नद्यांच्या संवर्धनासाठी 'रिव्हर मार्च' या संस्थेने पुढाकार घेतला आहे. दहिसर आणि पोईसर नदीच्या स्वच्छतेचे काम रिव्हर मार्च करत आहे. तसेच मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी रिव्हर मार्चने केलेल्या कामाचा आढावा देखील घेतला होता. रिव्हर मार्चच्या सदस्यांनी या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री बोलत होते.

नद्यांच्या उगम स्थानी होणाऱ्या अतिक्रमणाची कोणतेही प्रशासन जबाबदारी घेत नाही. पर्यावरण मंत्रालय, एमसीजीएम, म्हाडा आणि एमएमआरडीए यांनी या प्रकरणात लक्ष दिले पाहिजे. संयुक्त निर्णय न्यायालयात सादर करण्यासाठी पीएपी (प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल) प्रक्रियेला गती देण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला जाईल. नदीच्या काठावर आणि समुद्र किनाऱ्यावर काँक्रिटीकरणाचे संकट भेडसावत आहे. ही एक गंभीर समस्या निर्माण होत आहे, असे अनेक मुद्दे 'रिव्हर मार्च'च्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी सदस्यांनी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पर्याय सांगितले. त्यात गॅबोन वॉल (दगडी भिंत) यांचा देखील वापर नद्यांमध्ये केला पाहिजे. सध्या नवीन विकासाची कामे होत आहेत. त्यासाठी सिव्हीएस ट्रीटमेंट प्लॅनचा वापर करायला हवा, असेही या सदस्यांनी सांगितले.
प्रक्रिया करून सांडपाणी पुन्हा नदीत...

नद्यांमध्ये सांडपाणी सोडले जाते. त्यावर देखील प्रक्रिया करुन मग ते पाणी नदीमध्ये सोडले पाहिजे. धोबीघाट येथील वरच्या भागात लोकांची वस्ती आहे. तिथून येणाऱ्या पाण्याची एसटीपीद्वारे तपासणी करून, मग हे पाणी इथल्या लोकांना कपडे धुण्यासाठी दिले जावे. कपडे धुतल्यावर जे पाणी येईल, त्यावर देखील प्रक्रिया करून मग ते पाणी नदीमध्ये सोडले जावे, अशीही भूमिका यावेळी सदस्यांनी मांडली. यावर सकारात्मक तोडगा काढू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.डिसेंबर महिन्यात दहिसर नदी पात्रात मृत प्राण्यांचे अवशेष आढळले. या प्रकरणी कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. नद्यांमध्ये मृत प्राणी टाकणे हे चुकीचे आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, हा मुद्दा देखील सदस्यांनी बैठकीत मांडला.
हेही वाचा -

मिठी नदी प्रदूषित, फक्त किनारेच करणार सुशोभित

प्लॅस्टिक बॉटल रिसायकल मशीनमधून 2 महिन्यात 6 टन प्लॅस्टिक जमा


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


Loading Comments