Advertisement

गिरगाव चौपाटीचा एक भाग बंद, BMCचा मोठा निर्णय

मुंबई महापालिकेने (BMC) गिरगाव चौपाटीचा एक भाग बंद केला आहे.

गिरगाव चौपाटीचा एक भाग बंद, BMCचा मोठा निर्णय
SHARES

मुंबई महापालिकेने (BMC) गिरगाव चौपाटीचा एक भाग बंद केला आहे. समुद्र किनाऱ्यावरी 'कोस्टल रोड'च्या कामामुळे मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. पालिकेने बांधलेल्या प्लॅटफॉर्म-कम-व्ह्यूइंग गॅलरीजवळील समुद्रकिनाऱ्याचा काही भाग नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.

भूमिगत असणारा ड्रेनेज पंप ठेवण्यासाठी शाफ्ट उभारण्यात आल्याने गिरगाव चौपाटीच्या एका भागाला बॅरिकेॉटिंग करण्यात आले आहे, अशी माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता मानतय्या स्वामी यांनी दिलीय.

गिरगाव चौपाटी खालील बोगद्यात जे पाणी साचणार आहे, ते त्यातून बाहेर काढण्यात येणार आहे. त्यावर काम करण्यासाठी सात महिन्यांचा कालावधी लागण्याची अपेक्षा आहे. या कामामुळे बीचच्या स्वरूप कुठलाही बदल होणार नाही. काम पूर्ण झाल्यानंतर बीचचा हा भाग नागरिकांसाठी खुला केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येकी २.०७ किमी लांबीचे दोन ट्यूब ट्विन बोगदे बांधण्यात येत आहेत. दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीजवळून बोगदे सुरू होतील, ते गिरगाव चौपाटीपासून तांबे चौक, खिलाचंद गार्डन, बीएमसीचा मलबार हिल जलाशय, हँगिंग गार्डन, नेपियन सी रोड येथील हैदराबाद इस्टेटच्या खालून जातील आणि प्रियदर्शनी पार्क येथून बाहेर पडतील. या बोगद्यांसाठी वाहनचालकांना प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी कट आणि कव्हर बोगद्यातून जावे लागेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

वास्तविक बोगदा फक्त २.०७ किमीचा असेल. तर संपूर्ण प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या भागांचा समावेश केल्यास त्याची लांबी ३.४ किमी पर्यंत असेल.



हेही वाचा

मुंबईची हवा गुणवत्ता बिघडली, नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन

बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा