Advertisement

बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

कुठले मार्ग बंद कुठले मार्ग नो पार्किंग घोषित हे एका क्लिकवर जाणून घ्या.

बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त वाहतूक मार्गात बदल
SHARES

आज बाळासाहेब ठाकरे यांची 10वी पुण्यतिथी आहे. या दिनी दादरच्या शिवाजी पार्कवर राज्यभरातून शिवसैनिक एकत्र येण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी काही बदल केले आहेत. 

खालील मार्गावर वाहने उभी करण्यास प्रतिबंध असेल

  • एस. व्ही. एस. रोड, (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक जंक्शन)
  • केळुसकर रोड (दक्षिण) आणि केळुसकर रोड (उत्तर),
  • दादर एम.बी. राऊत मार्ग, (एस. व्ही. एस. रोड ते एल.जे. रोड)
  • दादर पांडुरंग नाईक मार्ग, (रोड नं. 5 जंक्शन ते एल.जे. रोड)
  • दादर दादासाहेब रेगे मार्ग, (सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौक)
  • दादर दिलीप गुप्ते मार्ग, (शिवाजी पार्क गेट क्र. 4 ते शीतलादेवी रोड) दादर
  • एन.सी. केळकर मार्ग (हनुमान मंदिर ते गडकरी चौक), दादर

खालील मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

  • स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक जंक्शन)
  • राजा बढे चौक जंक्शन ते केळुसकर मार्ग उत्तर जंक्शनपर्यंत
  • दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहिनी
  • गडकरी चौक येथून केळुसकर रोड दक्षिण व उत्तर
  • दादासाहेब रेगे मार्ग, सेनापती बापट पुतळा येथून गडकरी जंक्शनपर्यंत
  • बाळ गोविंददास मार्ग, पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन, सेनापती बापट रोडपासून पश्चिम दिशेला लेडी जमशेदजी मार्गापर्यंत

खालील मार्गावर वाहतुकीस अडथळा न करता वाहने उभी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

  • संपूर्ण सेनापती बापट मार्ग,
  • माहीम ते दादर पाच उद्यान (फाइव्ह गार्डन) परिसर
  • माटुंगा लखमशीनप्पू रोड
  • हिंदू कॉलनी, माटुंगा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा