SHARE

मुंबई - मुंबई महानगरपालिकेनं मलनि:सारण प्रकल्पाच्या सल्ल्यासाठी चक्क 180 कोटी रुपये उधळले असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातूून समोर आलीय. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवलेल्या माहितीनुसार मे. माॅ मैकडोनाल्ड प्रा. लि., मे. आरव्ही एंडरसन आणि असोसिएट, मे. माँट मैकडोनाल्ड लि. आणि मे. पीएचई कन्सलेट या चार कंपन्याची मलनि:सारण प्रकल्पाचे सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. त्यानुसार पालिकेला यासाठी तब्बल 180 कोटी मोजावे लागले आहेत. यातील 141.77 कोटींची रक्कम कंपन्यांना देण्यात आली असून, 38.23 कोटी देणे बाकी आहे. पालिकेकडे उच्च दर्जाचे अधिकारी, अभियंते असताना सल्लागारावर एवढा खर्च का असा सवाल गलगली यांनी यानिमित्तानं केलाय. तर एवढा खर्च करण्याएवेजी कायमस्वरूपी असे अधिकारी नियुक्त करा अशी सुचनाही पालिकेला केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या