Advertisement

'महापौरांचा निवास' राणीबागेतच, बंगल्याची डागडुजी सुरू


'महापौरांचा निवास' राणीबागेतच, बंगल्याची डागडुजी सुरू
SHARES

शिवाजी पार्कमधील 'महापौर निवास' शिवसेनाप्रमुख दि. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्याने महापौरांचे निवासस्थान भायखळा येथील राणीबागेतील बंगल्यात हलवले जाणार आहे. मात्र, आजवर राणीबागेतील बंगल्याच्या नूतनीकरणासाठी हालचाल न करणाऱ्या प्रशासाने बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू करून विद्यमान महापौरांना राणीबागेतील बंगल्यात हलवण्याचे जवळपास निश्चित केले आहे.

सुधार समिती व महापालिका सभागृहात मंजूर झालेल्या ठरावानुसार शिवाजी पार्क येथील महापौर निवासाची जागा लवकरच 'बाळासाहेब ठाकरे स्मारक विश्वस्त मंडळा'ला द्यावी लागणार अाहे.



आयुक्त निर्णयावर ठाम

शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानाची जागा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय झाल्यानंतर महापौरांसाठी नवीन निवासस्थानाचा शोध सुरु झाला. त्यानंतर प्रशासनाने महापौरांचे निवासस्थान राणीबागेतील बंगल्यात हलवण्याचे जाहीर केले. मात्र राणीबागेतील बंगल्याला विरोध दर्शवत शिवसेनेच्या महापालिकेतील नेत्यांनी महापौरांचे निवासस्थान मलबार हिलमधील अतिरिक्त आयुक्त राहत असलेल्या जागेत हलवण्याची, मागणी केली आहे.

असे असले तरी महापौरांसाठी राणीबागेतील बंगल्याच्या जागेवर आजही महापालिका आयुक्त अजोय मेहता ठाम आहेत. मलबार हिलमधील बंगल्याची मागणीही होऊनही आयुक्तांनी राणीबागेतच महापौरांचे निवासस्थान बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंगल्याच्या डागडुजीसाठी प्रशासनाने निविदा मागवून ६० लाखांचे कंत्राट देण्याचा निर्णयही घेतला आहे.


असे होईल नूतनीकरण

या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी महापौर, आयुक्त, अतिरिक्त इत्यादी महत्वाच्या व्यक्तींच्या शासकीय निवासस्थानांच्या दुरुस्ती व देखभाल आदी खात्यातून पैसे खर्च करण्यात येणार आहे. पुरातन वास्तू जतन सल्लागार म्हणून स्ट्रक्टवेल डिझायनर्स व कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कामाला मुंबई वारसा वास्तू जतन समितीने मंजूरी दिलेली आहे.

या कामांतर्गत बंगल्याची काही संरचनात्मक दुरुस्ती, तुटलेल्या लाद्या बदलणे, टॉयलेटची दुरुस्ती, आतील व बाहेरील प्लास्टरींग, रंगरंगोटी तसेच कौलारु छताच्या लाकडाची दुरुस्ती आदी कामे करण्यात येतील. हाय टेक इंजिनीअर्स या कंत्राट कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे.



हे देखील वाचा -

महापौर बंगला हडपण्याचा डाव - राज ठाकरे



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा