Advertisement

पालिकेनं सुरू केलं २ जलबोगद्यांचं काम

मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी मुंबई महापालिकेने चेंबूर – वडाळा – परळ, तसेच चेंबूर – तुर्भे दरम्यान दोन जलबोगदे उभारण्याचे, तर तीन ठिकाणी पर्यायी जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू केलं आहे.

पालिकेनं सुरू केलं २ जलबोगद्यांचं काम
SHARES

 मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी मुंबई महापालिकेने चेंबूर – वडाळा – परळ, तसेच चेंबूर – तुर्भे दरम्यान दोन जलबोगदे उभारण्याचे, तर तीन ठिकाणी पर्यायी जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू केलं आहे. जलबोगद्याची कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित भागातील नागरिकांना पुरेसा आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा होईल. तर ब्रिटिशकालीन जलवाहिन्या जीर्ण झाल्यामुळे त्यांच्यालगतच मोठय़ा जलवाहिन्या टाकण्याची कामे तीन ठिकाणी हाती घेण्यात आली आहेत. 

चेंबूर – वडाळा – परळ दरम्यान ९.७ किलोमीटर लांबीचा व २.५ मीटर व्यासाचा जलबोगदा बांधण्यात येत आहे. चेंबूर ते तुर्भे दरम्यान ५.५ किलोमीटर लांबीचा व २.५ मीटर व्यासाचा दुसरा जलबोगदा उभारण्याचे काम सुरू आहे. बाळकुम ते हजुरी पूल दरम्यान ९० वर्ष जुन्या दोन ब्रिटिशकालीन जलवाहिन्या आहेत. तिच्या लगत ४.५ किलोमीटर लांबीची व ३ मीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम  सुरू आहे. 

हजुरी पूल ते सॅडल टनेल दरम्यान आणि पवई ते मरोशी दरम्यानच्या देखील ९० वर्षे जुन्या जलवाहिन्यांलगत नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतलं आहे. या पर्यायी जलवाहिन्यांची लांबी अनुक्रमे ४.९ किलोमीटर आणि ६.३ किलोमीटर अशी आहे. तर दोन्ही जलवाहिन्यांच्या व्यास हा अनुक्रमे ३ मीटर व २.४ मीटर इतका आहे. ही दोन्ही कामे अनुक्रमे २०२१ व २०२२ मध्ये पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे.  येवई ते चिंचवली दरम्यान ४.५ किलोमीटर लांबीची व ३ मीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून वैतरणा व अप्पर वैतरणा तलावातील पाणी मुंबईपर्यंत आणणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांना पर्याय म्हणून ही जलवाहिनी टाकली जात आहे.



हेही वाचा -

कोरोनामुळे झोपडपट्ट्यांमधील मृत्यूचं प्रमाण ६० टक्के

लॉकडाऊनमुळं डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा