Advertisement

'माझा कचरा, माझी जबाबदारी' मुंबई महापालिकेचा उपक्रम


'माझा कचरा, माझी जबाबदारी' मुंबई महापालिकेचा उपक्रम
SHARES

घरातून बाहेर पडल्यावर आपल्याला जागोजागी कचरा पडलेला दिसतो. कचराकुंडी असूनही आजूबाजूला कचऱ्याचा ढीग साचलेला असतो. अनेक जण बिस्किट, वेफर्स खावून झाल्यानंतर रिकामी पाकिटे किंवा पाण्याच्या रिकाम्या बाटल्या थेट रस्त्यावर फेकून देतात. त्यामुळेच आज मुंबईत कचऱ्याचे प्रमाणे वाढले आहे.

त्यामुळे महापालिका लवकरच 'माझा कचरा, माझी जबाबदारी' हा उपक्रम राबवणार असून या उपक्रमाची नियमावली २ ऑक्टोबरपासून शहरात लागू होणार आहे. याच अनुषंगाने महापालिकेच्या जी/ उत्तर विभागातील दादर, माटुंगा, माहीम आणि धारावीमधील सोसायट्यांना नोटीस देण्यात आली आहे.



या विषयांवर चर्चासत्र महापालिकेच्या वतीने सहायक आयुक्त रमाकांत बिरादार तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे तानाजी घाग यांच्या उपस्थितीत गुरुवारी दादरच्या जी/ उत्तर विभागाच्या महापालिका कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात दादर, माटुंगा, माहीम आणि धारावीच्या सर्व सोसायटी सदस्यांनी सहभाग घेतला होता.

या चर्चेत सदस्यांनी उपक्रमाला संमिश्र प्रतिसाद दिल्याचे चित्र होते. मुलांना खेळायला आणि पार्किंगसाठी सोसायटीत जागा नाही. असे असताना वेस्ट मॅनेजमेंटसाठी जागा कशी उपलब्द्ध होणार? यावर तोडगा काढण्याचा सल्ला सोसायटीने महापालिकेला यावेळी दिला.



यावेळी प्रो इको मॅनेजमेंटचे डायरेक्टर अमोल कवे यांनी सेंद्रीय खत सोसायटीमध्ये कमी खर्चात कसे बनवता येईल? याचे प्रात्याक्षिक करून दाखवले. इतके दिवस मुंबईकरांचा कचरा उचलणे ही महापालिकेची जबाबदारी होती. आता 'माझा कचरा, माझी जबाबदारी' या तत्वावर ही मुंबईकरांची जबाबदारी राहणार आहे.

त्याचबरोबर २ ऑक्टोबरपासून 'ओला कचरा' उचलला जाणार नाही. तसेच विघटन न होणारा कचरा पालिकेकडून १५ दिवसांतून एकदा उचलला जाईल, अशी माहिती या चर्चासत्रात देण्यात आली.

ज्ञानसागर सोसायटी, आंद्रे हाऊस, सहकारी सोसायटी, सी. के. बोले मार्ग, पोर्तुगीज चर्च या सोसायटीच्या सेक्रेटरींनी माहिती घेतानाच सांगितले की, आम्ही आमच्या घरी मागील १५ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहोत, महापालिकेने सुरुवातीला जनजागृती केली पाहिजे. 'माझा कचरा, माझी जबाबदारी' ही संकल्पना अाधी नागरिकांना समजावून सांगितल्यानंतरच सक्ती केली पाहिजे.


काय आहे संकल्पना  ?

या संकल्पनेमध्ये झोपडपट्टी आणि चाळीमधील ओला आणि सुका कचरा विभाजीत करून महापालिकेकडून उचलण्यात येईल. माहीम, धारावी, माटुंगा आणि दादर विभागात ४० सोसायटीपासून या उपक्रमाला सुरुवात केली जाईल. २००० चौ. फू. पेक्षा मोठ्या आकाराच्या सोसायटी आणि १००० किलोपेक्षा जास्त कचरा तयार करणाऱ्या सोसायट्यांना हा नियम सक्तीचा आहे. म्हणजेच त्यांना विघटन होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागेल.

धारावी पम्पिंग स्टेशन येथे १५ टन क्षमतेच्या कचरा विघटनाचे काम सुरू झाले असून माटुंगा लेबर कॅम्प परिक्षण चौकीच्या बाजूला दुसरा प्रोजेक्ट तसेच माहीम कपडा बाजार, तसेच दादरला महाजन उद्यान सेनापती बापट मार्ग येथे हा प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.

'माझा कचरा, माझी जबाबदारी' समजून मुंबईकरांनी महापालिकेच्या कचरामुक्त योजनेला प्रतिसाद द्यावा. हॉटेल, मार्केटसाठी विविध उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत, असे मत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक मुख्य व्यवस्थापक तानाजी घाग यांनी व्यक्त केले.


हेही वाचा - 

सोसायटी कचरामुक्त ठेवा, मिळेल 'एफएसआय'चा लाभ

कचरा विल्हेवाटीसाठी भाजपा नगरसेवकांचा पुढाकार



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा