Advertisement

सोसायटी कचरामुक्त ठेवा, मिळेल 'एफएसआय'चा लाभ


सोसायटी कचरामुक्त ठेवा, मिळेल 'एफएसआय'चा लाभ
SHARES

ज्या सोसायट्या आपल्या कचऱ्याची प्रक्रिया करुन विल्हेवाट लावतील आणि कचरामुक्त ठेवतील अशा सोसायट्यांमधील ज्या ठिकाणी कचरा प्रक्रिया केली जाईल ती जागा त्यांच्या चटई क्षेत्रातून (एफएसआय) वगळण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया व साधनांच्या प्रदर्शनाचे आयोजन वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अभिनेते व स्वच्छता दूत अमिताभ बच्चन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई महापालिका महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उप महापौर हेमांगी वरळीकर, आयुक्त अजोय मेहता, आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते.

केवळ चांगल्या इमारती किंवा रस्त्यांमुळे शहरे स्वच्छ दिसत नाहीत, तर शहरांतील कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावल्यामुळेच ते स्वच्छ होतात. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. मुंबईतील सांडपाण्याचा एकही थेंब प्रक्रिया न करता समुद्रात जाऊ नये, यासाठी येत्या दोन-तीन वर्षांत सांडपाणी पूर्ण प्रक्रिया करुनच समुद्रात सोडण्याचे प्रयत्न करण्यात येतील.


शौचालयाचे प्रमाण ८३ टक्क्यांवर

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रातील शौचालयाचे प्रमाण ८३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ग्रामीण महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत ४० लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. शहरे स्वच्छ झाली पाहिजेत, कचऱ्याचे वर्गीकरणाचे काम राज्यातील शहरांमधून करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रदर्शन

कचरा व्यवस्थापनाचे हे प्रदर्शन उपयुक्त आहे. राज्यातील महापालिकांचे महापौर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या प्रदर्शनास भेट देता यावी यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून नियोजन करण्यात येईल. कचऱ्यामधून मूल्य तयार करण्यासाठी कचरा प्रक्रिया महत्वाची आहे. यामुळे रोजगार सुद्धा उपलब्ध होतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनातील प्रत्येक दालनास भेट देऊन माहिती घेतली.

शहरातील विविध सोसायट्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन कचरा व्यवस्थापनाचे नियोजन करावे. मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्लॅस्टिकच्या वापरावर पूर्ण बंदी आणावी, अशी मागणी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.


मुंबईत कचरा हा गंभीर प्रश्न आहे. मुंबईत कचरा जाळल्यानंतर विषारी वायू निर्माण होतात, म्हणून मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करावे. सोसायट्यांनी आपल्या कचऱ्याचे सोसायटीतच विल्हेवाट लावावी.
- विश्वनाथ म्हाडेश्वर, महापौर


स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने व्यक्तीगतस्तरावर काम केले पाहिजे. कचरा कमी करावा, आपल्या घराप्रमाणेच शहरही स्वच्छ ठेवावे, असे आवाहन यावेळी अमिताभ बच्चन यांनी केले.


या प्रदर्शनात आणखी काय?
बायोगॅस प्रकल्प, तात्पुरती शौचालये, इ कचरा व्यवस्थापन, विविध आकारातील व विविध प्रकारच्या अनेक कचरा पेट्या अशा अनेक बाबी या प्रदर्शनात आहेत. अगदी १०० रुपयांपासून ते १ लाख रुपये किमतीच्या कचरा व्यवस्थापनाशी संबंधित अनेक वस्तू या प्रदर्शनात आहेत. महापालिकेने आयोजित केलेले हे प्रदर्शन रविवार ३ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत सुरु राहिल.



हे देखील वाचा -

कचराऱ्याची विल्हेवाट लावा, नाहीतर गुन्हा दाखल होईल!

ग्रेट इस्टर्न लिंक्स सोसायटीची शून्य कचरा प्रकल्पाकडे वाटचाल



 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा