Advertisement

दादर, माटुंगा माहीम मधील अतिक्रमणांवर कारवाई


दादर, माटुंगा माहीम मधील अतिक्रमणांवर कारवाई
SHARES

दादर, माटुंगा आणि माहीम विभागातील अतिक्रमणांवर सोमवारी महापालिकेकडून कारवाई करण्यात अाली. जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण, निर्मूलन, वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) खात्यातर्फे बर्फ विक्रेते, कापलेली फळे, सरबत विक्रेत्यांवर ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

या कारवाईत अंदाजे 1 हजार 800 किलो बर्फ फोडून नष्ट करण्यात आला. महापालिकेने 2 मे पासून अाजपर्यंत केलेल्या धडक कारवाईत एकूण 13 हजार 400 किलो बर्फ नष्ट केला आहे. उन्हाळ्यात बर्फ खाण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक आहे. फेरीवाल्यांकडे असलेल्या बहुतेक बर्फाचा दर्जा चांगला नसल्यामुळे असा बर्फ आरोग्याला हानिकारक आहे. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी बर्फाचे गोळे विकले जातात तसेच सरबत आणि वेगवेगळ्या पदार्थांमध्ये बर्फ वापरला जातो. त्यामुळे अशा प्रकारची कारवाई यापुढेही चालू राहील, अशी माहिती जी/उत्तर विभागाकडून देण्यात अली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा