• खचलेल्या 'त्या' रस्त्याची अखेर पाहाणी
  • खचलेल्या 'त्या' रस्त्याची अखेर पाहाणी
  • खचलेल्या 'त्या' रस्त्याची अखेर पाहाणी
  • खचलेल्या 'त्या' रस्त्याची अखेर पाहाणी
  • खचलेल्या 'त्या' रस्त्याची अखेर पाहाणी
  • खचलेल्या 'त्या' रस्त्याची अखेर पाहाणी
SHARE

भक्ती पार्क - एक वर्षापासून वडाळा पूर्व येथील आणिक आगार लिंक रोडवरील भक्ती पार्क येथे रस्ता खचल्यानं वाहतुकीची समस्या निर्माण झालीये. याबाबत मनसेनं पाठपुरावा केल्यामुळे अखेर मनपा आणि एमएमआरडीएनं 29 नोव्हेंबरला खचलेल्या रस्त्याची पाहाणी केली.

वडाळा-भक्तीपार्कदरम्यान खाजण जमिनीवरील रस्ता खचल्याची तक्रार मनसे तसंच तनिष्का सामाजिक सेवा संस्थेनं एक वर्षापूर्वी महानगरपालिका, एमएमआरडीए आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यांनंतर मनपा मुख्य अभियंता संजय दराडे, कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी, सहाय्यक अभियंता राजेंद्र अकोले, दुय्यम अभियंता विद्यासागर ब्राम्हवाले यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी पाहाणी केली.

"या मार्गाच्या दुरुस्तीची निविदा काढली असून लवकरच कामाला सुरुवात होईल," असं संजय दराडे यांनी सांगितलं. "वर्षानंतर तरी हे काम मार्गी लागणार असून खड्ड्यांतून मार्ग काढणारी जनता आता सुटकेचा निःश्वास सोडेल," असं मनसेचे रस्ते आस्थापना सरचिटणीस मिलिंद पांचाळ यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या