Advertisement

लोअर परळच्या नेहरु नगर पुनर्विकासाला विशेष मंजुरी


लोअर परळच्या नेहरु नगर पुनर्विकासाला विशेष मंजुरी
SHARES

लोअर परळच्या नेहरू नगर पुनर्विकासाला महापालिकेने मंजुरी दिली आहे. गणपतराव कदम मार्गाच्या आतल्या शिवराम अमृतवार मार्गावरच्या महापालिका भाडेकरू वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव सुधार समितीपुढे आल्यानंतर पालिकेत विशेष सभा बोलावून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

विशेष म्हणजे याबाबतचा प्रस्ताव एप्रिल महिन्याच्या कार्यक्रम पत्रिकेवर ५४ क्रमांकाचा असून तोच प्रस्ताव विशेष सभा बोलावून मंजूर केल्यामुळे यासाठीच आलेल्या रीतसर प्रस्तावाचे काय होणार? असा प्रश्न आता सर्वच नगरसेवकांना पडला आहे.


प्रस्तावासाठी विशेष सभा का?

वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव फेबुवारी महिन्यात सुधार समितीपुढे मंजुरीला आला होता. मागील सुधार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. त्यामुळे हा प्रस्ताव महापालिकेच्या एप्रिल महिन्याच्या अजेंड्यावर विषय क्रमांक ५४म्हणून घेण्यात आला. मात्र तरीही, अत्यंत तातडीची बाब म्हणून ४ एप्रिलला विशेष सभेचे आयोजन करून तो मंजूर करण्यात आला. त्यामुळे रीतसर मंजुरीला आलेल्या कार्यक्रम पत्रिकेवरील विषय क्रमांक ५४चे महापौर काय करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


१० इमारतींचा होणार पुनर्विकास

शिवराम अमृतकर मार्गावर महापालिकेच्या मालकीच्या एकूण १० इमारती आहेत. या सर्व इमारती १९४० पूर्वीच्या आहेत. या दहा इमारतींमध्ये ९८ निवासी भाडेकरू आहेत. याशिवाय दोन कर्मचारी निवासस्थाने आणि १ मंदिर आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी श्री मंगलमूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून दोन वर्षांपूर्वी ऑल्वेज रिमेंबर प्रॉपर्टिज प्रायव्हेट लिमिटेड या विकासकाची नेमणूक केली आहे. याच विकासकाकडून वसाहतीचा पुनर्विकास केला जाणार आहे.



हेही वाचा

'परळच्या बोगदा चाळीचा पुनर्विकास प्रकल्प रद्द करा'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा