१०० टक्के रहिवाशांचे लसीकरण झालेल्या इमारतींना पालिका प्रमाणपत्र देणार आहे. हे प्रमाणपत्र वॉर्ड आरोग्य अधिकाऱ्या मार्फत इमारतींच्या गेट वर किंवा इतर दर्शनी भागावर चिटकवण्यात येईल. “माझी सोसायटी जबाबदार सोसायटी”, “My Society Responsible Society” या योजने अंतर्गत हे केलं जाणार आहे. हे पत्रक मराठी आणि इंग्रजीत लावण्यात येईल.
पालिका आरोग्य विभागानं सर्व २४ वॉर्ड्सला प्रत्येक प्रभागातील इमारतींची लसीकरणाची माहिती गोळा करायला सांगितलं आहे. वॉर्डच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी इमारतींना किती जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे याची माहिती मागवण्यास सुरुवात केलेली आहे.
पुढच्या काही दिवसात जशी माहिती प्राप्त होत जाईल त्या इमारतींवर प्रमाणपत्र लावण्यात येईल. मात्र ज्या ठिकाणी गरज आहे तिथं जनजागृती केली जाईल, अशी माहिती पालिका आरोग्य विभाग्याच्या अधिकाऱ्यानं दिली आहे.
दरम्यान गेले काही दिवस मुंबईत लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे. पुरेसा साठा उपलब्ध असूनही प्रतिदिन जवळपास ५०% लसींचा साठा शिल्लक राहत आहेत.
मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली आणि १२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत जवळपास १ कोटी २९ लाख लसींच्या मात्रा देण्यात आलेल्या आहेत. मिशन कवच कुंडल मोहिमेनुसार प्रतिदिन मुंबईत १ लाख ५० हजार ते २ लाख लोकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र सध्या मुंबईत प्रतिदिन सार्वजनिक लसीकरण केंद्रावर फक्त ५० ते ९० हजार लोकांचे लसीकरण होत आहे.
गणपती पर्यंत लसीकरणासाठी लोक पुढे येत होते. मात्र या महिन्यात रोजचे जवळपास ५० टक्के लसींच्या मात्रा शिल्लक राहतायेत. पहिला आणि दुसऱ्या डोस मध्ये जास्त दिवसांचा अंतर असल्यानं देखील दुसऱ्या डोससाठी लोक कमी येतात.
हेही वाचा