Advertisement

देवनार डंपिंगवर उंच टेहळणी मनोरे


देवनार डंपिंगवर उंच टेहळणी मनोरे
SHARES

देवनार - देवनार डंपिंग ग्राउंडवर सातत्यानं आग लागण्याच्या घटना घडतायेत. यामुळे प्रदुषणाची समस्या गंभीर होत चालीय. यावर उपाय म्हणून मुंबई पालिकेनं देवनार डंपिंग ग्राऊंडवर देखरेखीसाठी अकरा टेहळणी मनोरे बांधण्याचा निर्णय घेतलाय. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या देखरेख समितीच्या शिफारशीनुसार पालिकेनं यासंबंधीचा प्रस्ताव तयार केलाय. हा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणाराय. सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून या टेहळणी मनोऱ्यावरून संपूर्ण ग्राऊंडवर लक्ष ठेवण्यात येणाराय. यासाठी सुमारे 85 लाख 57 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मे. जोशी कन्सल्टंट या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून यासाठी निविदा मागवण्यात आल्यात. त्यानुसार या कामासाठी अनास इन्फ्रा या कंपनीची निवड करण्यात आलीय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा