Advertisement

'द पार्क क्लब'च्या मागील बाजच्या भूखंडावरील बांधकाम २ आठवड्यांत हटवणार – पालिका

'द पार्क क्लब'च्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावर उभारण्यात आलेलं लोखंडी बांधकाम दोन आठवड्यांत हटविण्यात येईल. तसंच, भूखंड पूर्ववत करणार असल्याची हमी मुंबई महापालिकेनं न्यायालयात दिली आहे.

'द पार्क क्लब'च्या मागील बाजच्या भूखंडावरील बांधकाम २ आठवड्यांत हटवणार – पालिका
SHARES

शिवाजी पार्क जवळील 'द पार्क क्लब'च्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावर फुटबॉल खेळण्यासाठी अनेक जण येत असतात. त्यामुळं त्यांच्या सोयीसाठी जाळी बसवण्यात आली होती. मात्र हे बांधकाम अनधिकृत असल्यामुळं या बांधकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली असून, मोकळ्या भूखंडावर उभारण्यात आलेलं लोखंडी बांधकाम दोन आठवड्यांत हटविण्यात येईल. तसंच, भूखंड पूर्ववत करणार असल्याची हमी मुंबई महापालिकेनं न्यायालयात दिली आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.


सर्वसामान्यांसाठी राखीव

'द पार्क क्लब'च्या मागील बाजूला असलेला मोकळा भूखंड सर्वसामान्यांना तसंच मुलांना खेळण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. १९९१च्या विकास आराखड्यात तशी नोंद करण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी लोखंडी पिलर्स व जाळी लावून किनाऱ्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर दरवाजा उभारण्यात आला आहे. त्याशिवाय, भूखंडालगत असलेल्या पार्क क्लबच्या मागील बाजूस भिंत बांधली जात आहे.


याचिका दाखल

भूखंडावरील हे बांधकाम अनधिकृत असल्यानं ते हटविण्यात यावं व हा भूखंड पूर्वीप्रमाणे सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात यावा या मागणीसाठी पंकज राजमाचीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.हेही वाचा -

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा भाजपात प्रवेशसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा