Advertisement

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा भाजपात प्रवेश

बॉलीवुड अभिनेता सनी देओलनं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संरक्षण मंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सनी दओल याला पंजाबच्या गुरुदासपूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा भाजपात प्रवेश
SHARES

बॉलिवूड अभिनेता सनी देओलनं मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत त्याने भाजपामध्ये प्रवेश केला. सनी दओल याला पंजाबच्या गुरुदासपूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली  जात आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यावर सनी देओल यानं देशाला नरेंद्र मोदी यांसारख्या नेतृत्वाची गरज असल्याचं म्हटलं आहे.


मोदींच्या नेतृत्वाची गरज

'ज्याप्रकारे माझे वडील अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी जोडले गेले होते. त्याचप्रकारे आता मी मोदीजींशी जोडलो गेलो आहे. देशातील तरुणांना मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे. मला जे काही शक्य असेल ती सर्व कामं मी करेन. मी फार बोलणार नाही पण काम करून दाखवेन', असं सनी देओल यानं भाजपामध्ये प्रवेश कल्यानंतर म्हटलं आहे.


गुरुदासपूरमधून उमेदवारी 

काही दिवसांपूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शहा व सनी देओल यांच्या भेट घेतली होती. त्यामुळं पंजाबच्या गुरुदासपूरमधून त्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणं, पंजाबमधील गुरुदासपूर इथे अभिनेते विनोद खन्ना भाजपाचे खासदार होते. पंजाबमध्ये १३ जागा आहेत. त्यापैकी ३ जागा म्हणजेच अमृतसर, गुरुदासपूर आणि होशियारपूर भाजप लढवणार आहेत.



हेही वाचा -

लोअर परळ स्थानकाबाहेर चेंगराचेंगरी, एक महिला जखमी

'आदित्य संवाद' कार्यक्रमात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा