Advertisement

'फ्लोटींग ट्रॅश बूम' रोखणार नाल्यातला कचरा


'फ्लोटींग ट्रॅश बूम' रोखणार नाल्यातला कचरा
SHARES

नाले आणि नद्याच्या पाण्यातील तरंगता कचरा रोखण्यासाठी नाल्यांच्या मुखावर 'फ्लोटींग ट्रॅश बूम' यंत्रणा बसवण्याचं मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार शहरातील ४ नद्यांसह ३ नाल्यांच्या मुखावर 'ट्रॅश बूम' यंत्रणा बसवण्यात येणार आहे.


कारण काय?

मुंबईतून वाहणाऱ्या नद्या तसंच नाल्यांतील कचऱ्यामुळे नाले तुंबतात. परिणामी शहरात पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते. हाच कचरा समुद्रात वाहून गेल्यास समुद्राचं पाणी आणि चौपाट्यांवर प्रदूषण होतं. त्यामुळे हा कचरा अडवून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तरंगत्या 'फ्लोटींग ट्रॅश बूम'चा वापर करण्यात येणार आहे.


सर्वांत प्रथम नदी आणि खाड्यांच्या मुखावर ही यंत्रणा बसवली जाणार होती. परंतु प्रशासनाने खाड्यांऐवजी त्यात नाल्यांचा समावेश केला आहे. ही यंत्रणा बसवण्यासाठी मेसर्स क्लिनटेक इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. ही यंत्रणा बसवण्यासाठी १ कोटी १७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.


कंत्राट पोहोचले सव्वा कोटींवर

नद्यांसह नाल्यांमधील तरंगता कचरा जमा करून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी बसवण्यात येणाऱ्या ७ ट्रॅश बूम्ससाठी सुमारे २५ लाखांचा खर्च अपेक्षित होता. परंतु प्रत्यक्षात हा खर्च आता सव्वा कोटींच्या घरात जावून पोहोचला आहे. त्यामुळे नक्की हा खर्च कसा वाढला असा प्रश्न आता खुद्द प्रशासनालाच पडला आहे.


'या' ठिकाणी बसवणर ट्रॅश बूम

दहिसर नदी, मिठी नदी, पोईसर नदी, ओशिवरा नदी, मोगरा नाला, इर्ला नाला तसेच लव्हग्रोव्ह नाला आदी ठिकाणी ट्रॅश बूम बसवण्यात येणार आहे.



हेही वाचा-

शाळा, कॉलेज, धार्मिकस्थळ, रुग्णालयाशेजारी नाले होणार पॉलिकार्बोनेट शेड बंदिस्त

अबब, मोगरा नाल्याच्या सफाईवरच सव्वा दोन कोटींचा खर्च!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा