शांताराम तलावाची देखभाल महापालिका करणार

 Kurar Village
शांताराम तलावाची देखभाल महापालिका करणार
शांताराम तलावाची देखभाल महापालिका करणार
शांताराम तलावाची देखभाल महापालिका करणार
See all

कुरारगाव – मालाड पूर्वेकडील कुरारगाव येथील पश्चिम द्रुतगती मार्गाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शांताराम तलावाची देखभाल महापालिका करणार आहे. याआधी खासगी संस्थेमार्फत ही व्यवस्था केली जात होती. तलावाच्या बांधकामात काही त्रूटी राहील्यामुळे तलावातील पाण्याला दुर्गंधी येणं, तलावातील मासे मरणे असे प्रकार गेल्या चार वर्षात 2-3 वेळा घडले. त्यामुळे तलावाच्या सुशोभीकरणाची जबाबदारी पालिकेने उचलावी यासाठी सुनील प्रभु यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं.

Loading Comments