Advertisement

पाणी गळती रोखण्यासाठी पालिकेचा पुढाकार


पाणी गळती रोखण्यासाठी पालिकेचा पुढाकार
SHARES

मुंबई - शहरातील जलवाहिनींमधून होणारी पाण्याची गळती थांबविणे, पाण्याचे दूषितीकरण, सिमेंट काँक्रिटी करणामुळे आणि पर्जन्य वाहिन्यांमधून जलवाहिन्यांचे स्थलांतर, सेवा वाहिन्यांचे जाळे कमी करणे तसेच जुन्या आणि गंजलेल्या जलवाहिन्या बदलण्याचे काम मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे. या कामासाठी एकूण 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी या कामांसाठी जानेवारी 2015 मध्ये दोन वर्षांच्या कालावधीसाठी परिमंडळ चारसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली होती. विद्यमान कंत्राटदाराची मुदत 31 डिसेंबर 2016 पर्यंत असल्याने नवीन कंत्राटदाराची नेमणूक तातडीने होणे गरजेचे असल्याने नवीन कंत्राटदार नेमण्यात येणार आहेत. या प्रस्तावात जुन्या आणि गंजलेल्या जलवाहिन्या बदलण्याचीही कामे देण्यात येणार असून, एकूण 61 जलवाहिन्या बदलण्याचे प्रस्तावित आहे. तर पी-उत्तर विभागातील नऊ ठिकाणच्या सेवा वाहिन्यांचे जाळे कमी करण्यात येणार आहे. यामध्ये अत्यावश्यक असलेल्या विद्यमान जलवाहिन्यांवरील झडपांचे चेंबर्स बांधणे, अत्यावश्यक नळखांब बसविणे, नादुरुस्त असलेल्या नळखाबांची दुरुस्ती करणे इत्यादी कामेही करण्यात येणार आहेत. सदर कामे केल्यामुळे अशुद्ध पाण्याच्या समस्या आणि पाणी गळतीच्या समस्या कमी होतील असे पालिकेचे म्हणणे आहे. या कामाच्या सर्व ठिकाणी रस्त्यावरील चरींचे पुर्नपुष्टीकरण करणे कंत्राटदाराला बंधनकारक राहणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा