Advertisement

ज्येष्ठ नागरिकांनो, महापालिका रुग्णालय, दवाखान्यांमध्ये घ्या मोफत उपचार


ज्येष्ठ नागरिकांनो, महापालिका रुग्णालय, दवाखान्यांमध्ये घ्या मोफत उपचार
SHARES

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये यापुढे ज्येष्ठ नागरिकांना निशुल्क वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत. सध्या सरकारी रुग्णालयांच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे.


१४ वर्षांचा वनवास संपणार

राज्य सरकारने सन २००४ मध्ये आपल्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार सेवा उपल्बध करून दिली होती. परंतु, ही मोफत उपचार सेवा लागू झाल्यास ज्येष्ठ नागरिकांच्या १४ वर्षांचा वनवास संपणार आहे.

शासनाने दोन वर्षांपूर्वी पालिकेच्या रुग्णालय, दवाखाने आणि आरोग्य केंद्र आदी ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार सेवा देण्याचा निर्णय घेतला होता. त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने झालेल्या गटनेत्यांच्या सभेत मोफत ऐवजी ५० टक्के सवलत देऊन उपचार सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


१०० टक्के अंमलबजावणीचा विचार

आता याच परिपत्रकाची १०० टक्के अंमलबजावणी करण्याचा विचार प्रशासनाने घेतला असून याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेत मंजुरीसाठी ठेवला आहे. मागील आरोग्य समिती सदस्या डॉ. सईदा खान यांनी शासनाच्या परिपत्रकाच्या धर्तीवर महापालिका रुग्णालय, दवाखाने आणि आरोग्य केंद्र या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तपासणीसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी विनाशुल्क उपचाराची सवलत देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे प्रशासन यासाठी अनुकूल असून याच्या मंजुरीसाठी यबाबतच प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेपुढे ठेवण्यात आल्याचे प्रमुख वैद्यकीय रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी स्पष्ट केलं आहे.


प्रस्ताव मंजूरीनंतर दिला जाईल लाभ

मुंबईत ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असून त्यांना बेस्टच्या तिकीट दरात महापालिकेने सवलत दिली आहे. तसेच त्यांच्या ज्येष्ठ नागरिक धोरण बनवून त्यांना विविध सेवांचा लाभ दिला जात आहे. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी स्वागत केले असून हा प्रस्ताव मंजूर करून ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा