Advertisement

महापालिका करणार १५० रस्त्यांची दुरूस्ती


महापालिका करणार १५० रस्त्यांची दुरूस्ती
SHARES

मुंबईकरांना खड्ड्यांपासून मुक्ती देण्यासाठी मुंबई महापालिका शहरातील १५० रस्त्यांची दुरूस्ती करणार आहे. मात्र मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू असल्याने वाहतूक पोलिसांकडून मंजुरी मिळण्यास अडचणी येत असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

रस्ते दुरूस्ती विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बहुतेक सर्वच महत्त्वाच्या रस्त्यांवर मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्ती कामासाठी परवानगी मिळवणं अवघड जात आहे. त्यामुळे रस्ते दुरूस्ती टप्प्याटप्प्यांत केली जाणार आहे.

सद्यस्थितीत मुंबईतील १,९४१ किमी लांबीच्या रस्त्यांपैकी अंदाजे ५०० किमीचे रस्ते पायाभूत सुविधांसाठी खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी आपापली कामे पूर्ण करून रस्ते पूर्ववत करावेत, अशी सूचना मध्यंतरी महापालिकेने केली होती.



हेही वाचा-

मुंबईत होऊ शकते पाणीकपात

३५ पे अँड पार्कसाठी पुन्हा निविदा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा