Advertisement

३५ पे अँड पार्कसाठी पुन्हा निविदा

मागील वेळी पालिकेने ५५ पे अँड पार्कसाठी निविदा मागवल्या होत्या. यामधील २० पे अँड पार्कसाठी ठेकेदार मिळाले होते. तर ३३ पे अँड पार्कच्या निविदा रद्द केल्या होत्या.

३५ पे अँड पार्कसाठी पुन्हा निविदा
SHARES


मुंबईतील ३५ पे अँड पार्कच्या देखरेखीसाठी बोली लावून ठेकेदार नेमण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा काढल्या होत्या. मात्र, बोली अयशस्वी झाल्याने पालिकेने निविदा रद्द केल्या होत्या. मात्र, अाता या वर्षीच्या अखेरपर्यंत पालिका पुन्हा एकदा पे अँड पार्कसाठी निविदा मागवण्याची शक्यता अाहे.


निविदा रद्द 

मागील वेळी पालिकेने ५५  पे अँड पार्कसाठी निविदा मागवल्या होत्या. यामधील २०  पे अँड पार्कसाठी  ठेकेदार मिळाले होते. तर ३३ पे अँड पार्कच्या निविदा रद्द केल्या होत्या. अाता पुन्हा एकदा या ३३  पे अँड पार्कसाठी निविदा मागवण्यात येणार अाहेत. रीगल सिनेमा, इरोज सिनेमा, फ्री प्रेस जर्नल रोड, एलअायसी रोड,  बॅलार्ड इस्टेट, ताडदेव, दादर, प्रभादेवी,  बांद्रा, अंधेरी अाणि घाटकोपर -मानखुर्द लिंक रोड या ठिकाणी ही  पे अँड पार्क अाहेत. 


तीन विभाग 

या सर्व पे अँड पार्कची एकूण क्षमता ३४६६ दुचाकी, १६०६ दुचाकी अाणि १५३ जड वाहने पार्क करण्याची अाहे. पालिकेच्या पे अँड पार्क धोरणानुसार शहराचे ए, बी, सी असे तीन विभाग केले अाहेत. हे सर्व विभाग फूटपाथ अाणि वाहनांची वाहतूक यानुसार ठरवण्यात अाले अाहेत. 



हेही वाचा - 

'लॉ'चे विद्यार्थी नवीन वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत

अवनीच्या शिकारीची चौकशी होणार, स्वतंत्र समिती स्थापन




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा