Advertisement

'लॉ'चे विद्यार्थी नवीन वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत

६०:४० या नव्या पॅटर्नला मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी स्थगिती दिली होती. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या 'लॉ' शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र विद्यापीठ प्रशासनाने लॉ च्या नवीन परीक्षांची तारीख अद्याप जाहीर न केल्यानं अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत.

'लॉ'चे विद्यार्थी नवीन वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत
SHARES

मुंबई विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 'लॉ' (विधी) अभ्यासक्रमाच्या परीक्षा पद्धतीत बदल करून सुरू केलेल्या ६०:४० या नव्या पॅटर्नला मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी स्थगिती दिली होती. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या 'लॉ' शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र विद्यापीठ प्रशासनाने लॉ च्या नवीन परीक्षांची तारीख अद्याप जाहीर न केल्यानं अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत.


न्यायालयात याचिका

मुंबई विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून विधी अभ्यासक्रमासाठी जुन्या परीक्षा पद्धतीत बदल करून ६०:४० असा नवीन पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या परीक्षा पद्धतीला विरोध करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना विद्यापीठाकडून विधी अभ्याक्रमासाठी ६०/४० परीक्षांबाबतचा निर्णय अर्धे शैक्षणिक वर्ष झाल्यानंतर घेण्यात आला. त्यामुळं हा निर्णय २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी हा नियम लागू करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश २९ ऑक्टोबर रोजीच्या सुनावणी दरम्यान विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले.


सूचना न देताच निर्णय

'लॉ' परीक्षा जुन्या पॅटर्ननुसार घ्यायच्या म्हणजे विद्यापीठ प्रशासनाला संपूर्ण तयारी करावी लागणार आहे. 'लॉ' च्या प्रश्नपत्रिका, परीक्षेची वेळ यांसह संपूर्ण वेळापत्रकातही बद होणार असल्यानं विद्यापीठ प्रशासनान या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र नव्याने होणाऱ्या परीक्षा किती गुणांच्या असतील, त्याचा पॅटर्न काय असेल, याबाबत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना कोणत्याही सूचना दिल्या नसल्याने अनेक विद्यार्थी विधी परीक्षांबद्दल प्रश्न घेऊन संघटनांकडे येत आहेत, असं 'स्टुडण्ट लॉ काऊन्सिल'ने म्हटलं आहे.

येत्या १५ नोव्हेंबरपासून 'लॉ' ची परीक्षा सुरू होईल असं परीपत्रक विद्यापीठानं जाहीर केलं होतं. मात्र ६०/ ४० परीक्षा पॅर्टनला उच्च न्यायलयातनं स्थगिती दिल्यानं विद्यापीठानं लॉ शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र या परीक्षा किती गुणांच्या असतील, किती तारखेला होतील याबाबतच परीपत्रक अद्याप विद्यापीठानं जाहीर केलं नसल्यानं अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत.
- सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडण्ट लॉ काऊन्सिल



हेही वाचा-

अखेर ६०:४० पॅटर्नला स्थगिती, 'लॉ'च्या विद्यार्थ्यांना दिलासा

तर मुंबई विद्यापीठाला टाळं ठोका, मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा