Advertisement

मुंबईत होऊ शकते पाणीकपात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांधील पाणीसाठा जलदगतीने संपत असून वारेमाप पाणीउपसा न थांबल्यास कदाचित मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो.

मुंबईत होऊ शकते पाणीकपात
SHARES

मुंबईत सध्या अनेक विभागांमध्ये अघोषित पाणीकपात सुरू असल्याची ओरड होत आहे. मात्र काही दिवसांत मुंबईकरांना खुऱ्याखुऱ्या पाणीटंचाईला तोंड द्यावं लागू शकतं. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांधील पाणीसाठा जलदगतीने संपत असून वारेमाप पाणीउपसा न थांबल्यास कदाचित मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो.


दुप्पट पाणीउपसा

गेल्या महिन्यात म्हणजेच १ आॅक्टोबर रोजी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९३ टक्के पाणीसाठा होता. हा पाणीसाठा ११ नोव्हेंबर रोजी घटून ७७ टक्क्यांवर पोहोचला. दरमहा साधारणत: १० टक्के पाणी मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी वापरलं जातं. पण मागच्या महिनाभरात दुप्पट पाणी वापरण्यात आलं.

एकूण ७ धरणांतून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला पाणी पुरवण्यासाठी या धरणांमध्ये १४.५० लाख दशलक्ष लिटर पाणी असणं आवश्यक आहे. मात्र यावेळेस जुलैनंतर पावसाने ओढ दिल्याने सरासरीच्या तुलनेत कमी जलसाठा या धरणांमध्ये जमा झाला.


  • मुंबईत पाण्याची मागणी दररोज ४२०० दशलक्ष लिटर्स एवढी आहे.
  • दररोज २५ ते ३० टक्के म्हणजे सुमारे ९०० दशलक्ष लिटर्स पाणी गळती तसंच चोरीमध्ये वाया जातं.



हेही वाचा-

३५ पे अँड पार्कसाठी पुन्हा निविदा

खूशखबर! महापालिकेत २९१ दुय्यम अभियंत्याच्या जागा भरणार



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा