Advertisement

टोपीवाला मार्केटच्या पुनर्विकासाला लवकरच सुरुवात

मंडईच्या पुनर्विकासासाठी परवानाधारक दुकानदारांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्यात आली असली, तरी ती पुरेशी नाही. १९५ दुकानदारांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी बांधलेल्या इमारतींमध्ये केवळ १६३ दुकानांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे उर्वरीत ३२ दुकानदारांना जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.

टोपीवाला मार्केटच्या पुनर्विकासाला लवकरच सुरुवात
SHARES

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या गोरेगावच्या टोपीवाला मंडई आणि नाट्यगृहाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. या मंडई व नाट्यगृहाच्या बांधकामासाठी महापालिकेने कंत्राटदारांची निवड केली असून त्यासाठी सुमारे १५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.


पर्यायी जागा अपुरी

मंडईच्या पुनर्विकासासाठी परवानाधारक दुकानदारांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्यात आली असली, तरी ती पुरेशी नाही. १९५ दुकानदारांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी बांधलेल्या इमारतींमध्ये केवळ १६३ दुकानांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे उर्वरीत ३२ दुकानदारांना जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.



३० वर्षे जुनं मार्केट

गोरेगाव पश्चिमेकडील टोपीवाला मार्केट ३० वर्षांहून अधिक जुनं झाल्याने त्याचा पुनर्विकास करून त्याठिकाणी मंडईसह नाट्यगृहाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्केटमध्ये एकूण २०६ परवानाधारक दुकानदार असून त्यातील ८१ दुकानदार बाजार विषयक असून उर्वरीत १२५ हे अन्य वस्तूंचे विक्रेते आहेत.

स्थानिक आमदार व मंत्री सुभाष देसाई, तत्कालिन नगरसेविका प्रमिला दिलीप शिंदे यांच्यासह दुकानदारांच्या व्यापारी वेल्फेअर असोसिएशनने केलेल्या मागणीनुसार महापालिकेने या मार्केटचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.


पर्यायी इमारतीचं बांधकाम पूर्ण

मार्केटमधील दुकानदारांच्या तात्पुरत्या पुनर्विकासासाठी दोन ते अडीच वर्षांपूर्वी संक्रमण शिबिराच्या इमारतीचं काम हाती घेण्यात आलं. त्यानुसार पर्यायी इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं असून आता मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. या पुनर्विकासात वाहनतळांसाठी २ तळघर, २ मजल्यांवर बाजार आणि तिसऱ्या मजल्यावर नाटयगृह, चौथ्या मजल्यावर सभागृह आणि एक मजला मनोरंजनासाठी आणि उर्वरीत ७ मजल्यांचा वापर निवासस्थानांसाठी केला जाणार आहे.



सनराईज स्टोन कंपनी बाद

या मार्केट व नाट्यगृहाच्या इमारतीच्या बांधकामासाठी सर्वात कमी दर लावून सनराईज स्टोन इंडस्ट्रीज कंपनीने काम मिळवलं होतं. परंतु सनराईज स्टोन ही कंपनी रस्ते घोटाळाप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेल्या रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीची संलग्न कंपनी असल्याचं समोर आलं. या दोन्ही कंपनीचे काही संचालक सामाईक आहेत. त्यामुळे या कंपनीला निलंबित करून दुसऱ्या क्रमांकावरील शेठ कंस्ट्रक्शन कंपनीला या कामासाठी पात्र ठरवून त्यांना हे कंत्राट देण्यात आलं.



हेही वाचा-

टोपीवाला मार्केटच्या पुनर्विकासात बाजारासाठी फक्त दोनच मजले

गोरेगाव नाट्यगृहाला प्रभाकर पणशीकरांचं नाव



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा