वर्सोव्यातील 138 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

 Versova
वर्सोव्यातील 138 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
Versova, Mumbai  -  

वर्सोवा - येथील सीआरझेडच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून त्यावर अनधिकृतपणे बांधकामे करण्यात आली होती. यासर्व अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 138 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. 

वर्सेावा परिसरातील सिद्धार्थनगर भागातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीतील सागरी नियमन क्षेत्रात मोडणाऱ्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली होती. ही अतिक्रमणे हटवण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विनंतीनुसार महापालिकेद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दल आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने महापालिकेच्या पथकाने आतापर्यंत 138 अतिक्रमणे तोडली असल्याची माहिती ‘के/पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

Loading Comments