दिव्यांग महिलेच्या स्टॉलवर पालिकेची कारवाई

 Sewri
दिव्यांग महिलेच्या स्टॉलवर पालिकेची कारवाई

शिवडी - डी. जी. महाजनी पथ परिसरात मनपा चाळीत दूरध्वनी बूथ स्टॉल चालवणाऱ्या दिव्यांग महिला शाहीन शेख यांच्यावर पालिकेमुळे उपासमारीची वेळ आलीय. बुधवारी पालिकेच्या एफ - दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाहीन यांचा बूथ तोडला. दूरध्वनी बूथ स्टॉल चालवून शाहीन कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होत्या.

गेल्या 17 वर्षांपासून शाहीन 'सना टेलेकॉम' या नावाने दूरध्वनी बूथ स्टॉल चालवत होत्या. परंतु इथल्या जागेचा पुनर्विकास करण्यात येत असल्याने हा स्टॉल दुसऱ्या जागी स्थलांतरित करण्यात यावा, असे पत्र महापालिका एफ- दक्षिण विभागाकडून देण्यात आले आहे. पण शाहीन यांना देण्यात आलेल्या नवीन जागेवर कोणतीही सेवा-सुविधा नाही. नवीन जागेवर पालिकेने सुविधा द्यावी आणि मग दूरध्वनी बूथ स्टॉलचे स्थलांतर करावे. तसेच पुनर्विकासाचे काम पूर्ण झाल्यास पुन्हा याच जागी दूरध्वनी बूथ स्टॉलची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी शेख दाम्पत्यांकडून करण्यात आलीय.

"मनपा चाळ इथला स्टॉल त्या पुनर्विकासात अडथळा ठरत आहे. त्यामुळे बाधा ठरणारे हे स्टॉल पालिकेच्या धोरणानुसार स्थलांतरित करण्यात येत आहे," असे महापालिका एफ दक्षिण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक विजय अडसूळ यांनी स्पष्ट केले.

Loading Comments