Advertisement

जीएसटीचा दुसराच हप्ता चुकला, धनादेशाची वाट पाहतेय महापालिका


जीएसटीचा दुसराच हप्ता चुकला, धनादेशाची वाट पाहतेय महापालिका
SHARES

जीएसटीमुळे महापालिकेला होणाऱ्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारकडून देण्यात येणारा दुसराच हप्ता चुकला आहे. दर महिन्याच्या 5 तारखेला नुकसान भरपाईचा धनादेश महापालिकेला दिला जाईल, असे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी जाहीर केले होते. परंतु शनिवारी ५ ऑगस्टला संध्याकाळी उशिरापर्यंत हा धनादेश महापालिकेला प्राप्त झाला नव्हता. यामुळे दुसऱ्याच हप्त्यात सरकारने आपला रंग दाखवण्यास सुरुवात केल्याची महापालिकेत चर्चा आहे.


पहिला हप्ता वेळेवर

मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेला जकात कर ३१ जूनपासून बंद करण्यात आला. जकातीपासून महापालिकेला सरासरी ७ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळायचा. परंतु १ जुलैपासून जकात कर बंद झाल्याने महापालिकेला नुकसान भरपाई म्हणून ६४७.३४ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचा धनादेश ५ जुलै रोजी देण्यात आला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा धनादेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सुपूर्द केला होता.


आश्वासन विसरले?

पहिला हप्ता देताना मुनगंटीवार यांनी यापुढे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला महापालिकेला धनादेश देण्याचे आश्वासन दिले. परंतु ५ ऑगस्ट उजाडला तरी हा धनादेश महापालिकेच्या लेखा विभागाकडे किंबहुना आयुक्तांच्या कार्यालयाकडे जमा झाला नव्हता.

महापालिकेचे प्रमुख लेखापाल (वित्त) हेमलता येखे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी अद्याप राज्य सरकारकडून धनादेश प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. आम्हीही याच धनादेशाची वाट पाहत असल्याचे त्यांनी त्यांची म्हटले आहे.


जकातीपासून वर्षाला मिळणारे उत्पन्न : ६८०० कोटी रुपये

एप्रिल ते जूनपर्यंत जमा झालेला जकातीचा कर : सुमारे १९०० कोटी रुपये

जीएसटीमुळे मिळणारी मासिक नुकसान भरपाई : ६४७.३४ कोटी रुपये

जकात बंद झाल्यामुळे विस्थापित झालेले कामगार : १३००



हे देखील वाचा -

अर्थमंत्री मुंबई महापालिकेच्या दारी! जीएसटीचा पहिला हप्ता देणार



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा