Advertisement

अर्थमंत्री मुंबई महापालिकेच्या दारी! जीएसटीचा पहिला हप्ता देणार


अर्थमंत्री मुंबई महापालिकेच्या दारी! जीएसटीचा पहिला हप्ता देणार
SHARES

मुंबईत १ जुलैपासून वस्तू व सेवा कर आकारला जाणार असल्यामुळे महापालकेच्या वतीने वसूल करण्यात येणारा जकात कर बंद केला जाणार आहे. हा जकात कर रद्द करण्यात येणार असल्यामुळे महापालिकेचा उत्पन्नाचा मोठा मार्ग बंद होणार आहे. 

परंतु जीएसटी लागू करण्यात आल्यामुळे याची भरपाई म्हणून सरकारच्या वतीने मुंबई महापालिकेला दिली जाणार आहे. या जीएसटीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम येत्या ५ जुलैला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे खुद्द अर्थमंत्री सुधीर मनगंटीवार हे सुपूर्द करणार आहेत. यासाठी खुद्द अर्थमंत्री मुंबई महापालिकेची पायरी चढणार आहेत.


पाच वर्षेच मिळणार जीएसटीची भरपाई

मुंबई महापालिकेच्या एकूण उत्पन्नाच्या ३१ टक्के उत्पन्न असलेला जकात कर ३० जूनला बंद होत आहे. या जकातीतून वर्षाला पावणे सहा हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. परंतु जकात कर रद्द करून वस्तू व सेवा कर (जीएसटी)आकारण्याचा निर्णय केंद्राने घेतल्यामुळे याची अंमलबजावणी १ जुलैपासून केली जाणार आहे. 

जीएसटी लागू होणार असल्यामुळे याची नुकसान भरपाई म्हणून मागील वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारे सरासरी रक्कम महापालिकेला पुढील पाच वर्षांमध्ये दिली जाणार आहे. मात्र त्यानंतर ही रक्कम देणे बंद केले जाणार आहे.


महापौरांकडे देणार धनादेश

जीएसटी बंद होणार असल्यामुळे याची नुकसान भरपाई म्हणून महापालिकेला राज्य सरकारच्या वतीने रक्कम दिली जाणार आहे. या नुकसान भरपाईच्या रकमेचा पहिल्या हप्त्याचा धनादेश येत्या ५ जुलैला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मनगंटीवार स्वत: मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे सोपवणार असल्याचे सूत्रांकडून समजते.


पहिला हप्ता कितीचा?

राज्याकडून महापालिकेला दर महिना ४८० कोटी रुपये देण्याचे निश्चित केले आहे. मात्र, हा आकडा निश्चित नसून अर्थमंत्री हा पहिला हप्ता देताना एक महिन्याची रक्कम देतात की तीन महिन्यांची याबाबत अद्यापही काही निश्चित नाही. परंतु, ही रक्कम एक महिन्याचीच असेल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे


अर्थमंत्री प्रथमच महापालिकेत

राज्याचे अर्थमंत्री आजवर बरेच होऊन गेले आहेत. परंतु, आजवर एकाही अर्थमंत्र्याने पदावर असताना महापालिकेत पायधूळ झाडली नाही. जीएसटीच्या निमित्ताने का होईना, खुद्द अर्थमंत्री मुनगंटीवार महापालिकेत येत आहेत. जर मुनगंटीवार आले, तर महापालिकेत येणारे ते पहिले अर्थमंत्री ठरतील. मुनगंटीवार यांच्यासोबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



हेही वाचा

जीएसटी आला, पण 761 औषधांवर फारसा परिणाम नाही !




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा