तक्रार आल्यास क्लीनअप मार्शलवर होणार कारवाई

नव्यानं मागवण्यात येणाऱ्या निविदांमध्ये कडक अटींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये क्लीनअप मार्शलविरोधात तिसऱ्यांदा तक्रार आल्यास त्या संस्थेला १० ते २० हजारांचा दंड केला जाणार आहे. शिवाय त्यांना काळ्या यादीत टाकण्याची तरतूद करण्यात आली आहे.

SHARE

मुंबईत अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या क्लीनअप मार्शलकडून होणाऱ्या मनमानी कारवाईमुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. क्लीनअप मार्शलविरोधात तक्रारी आल्यानंतरही त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची तरतूद नव्हती. परंतु नव्याने मागवण्यात येणाऱ्या निविदांमध्ये क्लीनमार्शल विरोधात अथवा त्यांच्या संस्थांविरोधात तक्रारी आल्यास संबंधित संस्थेवर दंडात्मक कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची अट समाविष्ट करण्यात आली आहे.


निविदा प्रक्रिया सुरू

बृहन्मुंबई स्वच्छता व आरोग्य उपनिधी २००६ मधील तरतुदीनुसार कमीत कमी १०० आणि जास्तीत जास्त १००० रुपये एवढा दंड आकारण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मुंबईतील २४ विभाग कार्यालयांपैकी २२ विभागांमध्ये अस्वच्छता करणाऱ्यांवर पकडून त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी संस्थांची नेमणूक करण्यात आली होती.


कालावधी वाढवला

विद्यमान संस्थांचा कालावधी जुलैमध्ये संपुष्टात आल्यानंतर नवीन संस्थांची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. परंतु त्याला विलंब झाल्यामुळे विद्यमान संस्थांना ४ महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.


कुठल्या अटींचा समावेश

परंतु नव्यानं मागवण्यात येणाऱ्या निविदांमध्ये कडक अटींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये क्लीनअप मार्शलविरोधात तिसऱ्यांदा तक्रार आल्यास त्या संस्थेला १० ते २० हजारांचा दंड केला जाणार आहे. शिवाय त्यांना काळ्या यादीत टाकण्याची तरतूद करण्यात आली आहे.


कडक कारवाई

यापूर्वी अशाप्रकारच्या अटींचा यामध्ये समावेश नव्हता. त्यामुळे लोकांकडून तक्रारी आल्यानंतरही या संस्थांविरोधात कारवाई करता येत नव्हती. परंतु अशाप्रकारच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्यामुळे संस्थांवर दंडात्मक तसेच कडक कारवाई करता यावी, याकरता अटींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) विश्वास शंकरवार यांनी दिली.


वसुली होणार बंद?

या क्लीनअप मार्शलकडून मोठ्या प्रमाणात ‘वसुली’ होत असल्याचा तक्रारी येतच असतात. काही वेळा क्लिनअप मार्शलविरोधात थेट पोलिस तक्रारी झाल्याचेही प्रकार घडले आहेत. एवढंच नव्हे, तर या क्लीनअप मार्शलविरोधात चक्क नगरसेवकांनीही तक्रारी करून या क्लीनअप मार्शलना खंडणीखोर म्हणूनही संबांधलं होतं.


इथं करू शकता तक्रार

क्लीनअप मार्शल विरोधात रहिवाशांना संबंधित विभाग कार्यालयांमध्ये तक्रार करता येणार आहे. शिवाय महापालिकेच्या वेबसाईटवरील १०८ व १९१६ हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करता येईल.हेही वाचा-

स्वच्छता दूरच; क्लीनअप मार्शल्सनी वर्षभरात केली ४ कोटींची कमाई!

'असं' भंगलं महापालिकेचं ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मितीचं स्वप्न!संबंधित विषय
ताज्या बातम्या