Advertisement

स्वच्छता दूरच; क्लीनअप मार्शल्सनी वर्षभरात केली ४ कोटींची कमाई!

शहराच्या स्वच्छतेपेक्षा क्लीनअप मार्शल केवळ अस्वच्छता पसरवणाऱ्यांकडून पावत्या फाडून स्वत:ची तिजोरी भरत असल्याचं स्पष्ट होत आहे. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे अवघ्या वर्षभरातच क्लीनअप मार्शलनी तब्बल ८ कोटींचा गल्ला जमवला आहे.

स्वच्छता दूरच; क्लीनअप मार्शल्सनी वर्षभरात केली ४ कोटींची कमाई!
SHARES

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणं तसंच थुंकणं आदी अस्वच्छता पसवणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी महापालिकेने रस्त्यांवर क्लीनअप मार्शल तैनात केले आहेत. प्रत्यक्षात शहराच्या स्वच्छतेपेक्षा क्लीनअप मार्शल केवळ अस्वच्छता पसरवणाऱ्यांकडून पावत्या फाडून स्वत:ची तिजोरी भरत असल्याचं स्पष्ट होत आहे. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे अवघ्या वर्षभरातच क्लीनअप मार्शलनी तब्बल ८ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यातील ४ कोटी रुपये क्लीनअप मार्शल कंपन्यांच्या तिजोरीत जमा झाले आहेत.


कधी झाली नेमणूक?

मुंबईतील २४ प्रभागांपैकी २२ प्रभागांमध्ये एप्रिल २०१६पासून क्लीनअप मार्शल संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांची जुलै २०१७ पासून एका वर्षांकरता नेमणूक करण्यात आली होती. हा एक वर्षांचा कालावधी जुलै २०१८ मध्ये संपत असून या कंपनीला अजून ४ महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.


किती दंड आकारतात?

बृहन्मुंबई स्वच्छता व आरोग्य उपनिधी २००६मधील तरतुदीनुसार क्लीनअप मार्शलना कमीत कमी १०० आणि जास्तीत जास्त १००० रुपये एवढा दंड आकारण्याचा अधिकार आहे. त्यानुसार एका वर्षाच्या कालावधीत ४ लाख ५४ हजार १५८ प्रकरण हाताळून त्यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या कालावधीत सुमारे ८ कोटी ६ लाख ९२ हजार १२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यातील ५० टक्के म्हणजेच ४.०३ कोटी एवढी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे, तर उर्वरीत ५० टक्के रक्कम ही संस्थांच्या तिजोरीत गेली आहे.हेही वाचा-

जुन्याच कचरा कंत्राटदारांना मुदतवाढ; महापालिकेवर आली नामुष्की

उघड्यावर शौचास जाल तर, 100 रुपयांचा दंडRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा