Advertisement

महापालिका दहिसरमध्ये उभारणार २ इंटरनॅशनल स्पोर्ट्स काॅम्प्लेक्स

महापालिकेच्या आर/उत्तर विभागातील भावदेवी आणि ज्ञानधारा मैदानात सायकल ट्रॅक, धावपट्टी, प्रेक्षकांना बसण्याची जागा, टेनिस कोर्ट, बॉस्केट बॉल, व्हॉलीबॉल कोर्ट, कब्बडी कोर्ट, खो-खो कोर्ट देखील उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

महापालिका दहिसरमध्ये उभारणार २ इंटरनॅशनल स्पोर्ट्स काॅम्प्लेक्स
SHARES

मुंबई महापालिका दहिसर पश्चिमेकडील भावदेवी आणि ज्ञानधारा मैदानाचा विकास करणार असून इथं क्रिकेट आणि फुटबॉलच्या आंतराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मैदानाबरोबरच चांदिवलीतील पडिक जागेवर उद्यान विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.


आणखी कुठल्या सुविधा?

महापालिकेच्या आर/उत्तर विभागातील भावदेवी आणि ज्ञानधारा मैदानात सायकल ट्रॅक, धावपट्टी, प्रेक्षकांना बसण्याची जागा, टेनिस कोर्ट, बॉस्केट बॉल, व्हॉलीबॉल कोर्ट, कब्बडी कोर्ट, खो-खो कोर्ट देखील उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. या मैदानाच्या विकासकामासाठी २३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हे मैदान शहाजी राजे क्रीडा संकुलाच्या धर्तीवर विकसित करणार असल्याचं उद्यान कक्षाने स्पष्ट केलं.


चांदिवलीतही मैदान

एल विभागातील चांदिवली फॉर्म रोडवरील टीडीआर प्लॉट या भूखंडावर महापालिका उद्यान विकसित करणार आहे. हा भूखंड पडिक असून याठिकाणी नवीन संरक्षक भिंतीचं बांधकाम करणं, अंतर्गत पदपथ, सुरक्षा चौकी, प्रवेशद्वाराची कामे, उद्यानासाठी मातीचा भराव टाकणे, वरिष्ठ नागरिकांकरीता बसण्याची जागा, योगा शेड, गझेबो, मुलांची खेळणी, सीसीटिव्ही कॅमेरा इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.


फुलपाखरूंचं दालन पाडणार

मुंबईतील भूमिगत जलवाहिन्यांच्या कामासाठी टनेल बनवण्यात आल्यामुळे या कामासाठी स.का.पाटील उद्यानांतून मशिन टाकण्यात आली होती. यामुळे मागील अनेक वर्षांपासून स. का. पाटील उद्यानाची दुरावस्था झाली होती. परंतु ३ वर्षांपूर्वी या उद्यानांचं काम करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा या उद्यानाचे सौदर्यीकरण केलं जात आहे. त्यात उद्यानातील फुलपाखरू दालन पाडण्यात येणार आहे.

याशिवाय पदपथ, दोन शौचालये, पंप रुम, नैसर्गिक खताचा खड्डा, दगडी कारंजा हे सर्व तोडून त्याठिकाणी लहान मुलांना खेळण्याची जागा, स्केटींग रिंग, पिण्याचा पाण्याचा प्याऊ, दोन गझीबो तसेच प्रवेशद्वाराचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये स. का. पाटील पुतळ्यांचीही रंगरंगोटी करण्यात येणार आहे. याशिवाय व्यायामाचं साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.



हेही वाचा-

मुंबईकरांना मिळणार चामिंडा वास, वासिम जाफरकडून प्रशिक्षण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा