Advertisement

मुंबईतील १६ पुलांची दुरूस्ती लवकरच; स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर

हिमालय पूल दुर्घटनेनंतर जाग आलेल्या मुंबई महापालिकेनं आता मुंबई शहरातील १६ पुलांची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी डी.डी. देसाई स्ट्रक्चरल ऑडिटनं या पुलांची तपासणी केली होती.

मुंबईतील १६ पुलांची दुरूस्ती लवकरच; स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर
SHARES

हिमालय पूल दुर्घटनेनंतर जाग आलेल्या मुंबई महापालिकेनं आता मुंबई शहरातील १६ पुलांची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी डी.डी. देसाई स्ट्रक्चरल ऑडिटनं या पुलांची तपासणी केली होती. आता या पुलांची तपासणी महापालिकेच्याच अभियंत्यांनी केल्याची माहिती दिल्यानंतर स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.


गोखले पुलानंतर ऑडिट

मुंबईतील अंधेरी स्थानकानजीक असेल्या गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर पालिकेनं मुंबईतील २९६ पुलांचं स्ट्क्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबई शहरातील ७३ पुलांचं ऑडिट देसाईंच्या कंपनीनं केली होती. देसाईंनी १६ पुलांची दुरूस्ती सुचवली होती होती. त्यानंतर हिमालय पुलाची दुर्घटना घडली. त्यानंतरही देसाईंच्याच सल्ल्यानुसार ऑडिट करणार असल्याचं समोर आल्यानंतर सर्व पक्षांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर आता या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेच्याच अभियंत्यांनी केल्याचं सांगत पूर्व आणि पश्चिम उपनगरातल्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि दुरूस्तीही सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.


प्रस्तावात देसाईचं नाव नाही

पुलांची दुरूस्ती देसाईच्या सल्ल्यानंतरच करण्यात येणार असल्याचा उल्लेख यापूर्वी प्रस्तावात करण्यात आला होता. याला सर्वपक्षीय सदस्यांनी विरोध केला. देसाईचं नाव काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असताना, तसंच कंपनीच्या ऑडिटरलाही अटक करण्यात आली असताना देसाईचं नाव असलेल्या प्रस्तावाला मंजुरी न देण्याची उपसुचना विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी मांडली होती.


कोणत्या पुलांची दुरूस्ती

ग्रॅण्ट रोड रेल्वेवरील पूल, ऑपेरा हाऊस पूल, फ्रेंच पूल, फॉकलॅण्ड रोड, ग्लोरिया चर्च उड्डाणपूल, एसव्हीपी रोड रेल्वेवरील पूल, वाय. एम. उड्डाणपूल, सीताराम सेलम काय ब्रिज उड्डाणपूल, ईस्टर्न फ्री वे, सर पी डि’मेलो पादचारी पूल, डॉकयार्ड रोड पादचारी पूल, प्रिसेन्स स्ट्रीट पादचारी पूल या पुलांची दुरुस्ती सुरू करण्यात येणार आहे.
हेही वाचा -

केवळ अभियंत्यांना जबाबदार धरू नये; पालिकेच्या इंजिनिअर्स युनियनचं आयुक्तांना पत्र

लोकलच्या महिला डब्यावर दगडफेक, एक प्रवासी जखमीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा