Advertisement

रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी २५० कोटी रुपये खर्च

मुंबईतील रस्त्याच्या खड्ड्यांच्या दुरूस्तीची कामं पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहे. या खड्ड्यांच्या दुरूस्तीसाठी २५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी २५० कोटी रुपये खर्च
SHARES

मुंबईतील रस्त्यांची अनेकदा दुरूस्ती करण्यात येते. मात्र, पावसाळ्यात मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडल्यास रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्डे पडतात. मागील काही दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानं रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळं या खड्ड्यांच्या दुरूस्तीची कामं करण्यात येणार आहे. हे दुरूस्तीचं काम पावसाळ्यानंतर करण्यात येणार असून, या कामासाठी २५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

दुरूस्तीचं काम हाती

रस्त्यावरील छोट्या-मोठ्या खड्ड्यांच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. कफ परेड, नरीमन पॉईंट, दादर येथील महत्वाच्या रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. रस्त्यांच्या दुरूस्तीच्या कामासाठी पालिकेनं ठेकेदारांच्या नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्याशिवाय, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी विविध सेवा कंपन्यांना वारंवार रस्ता खोदावा लागू नये यासाठी रस्त्याच्या कडेला केबल टाकण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.

'या' रस्त्यांची होणार दुरूस्ती

गिरगाव-राजाराम मनमोहन रॉय, सेनापती बापट मार्ग, प्रतिक्षा नगर वाचनालय रोड-सायन, बरकत अली दर्गा रोड, गणेश गल्ली रोड, दोस्ती एकर रोड-वडाळा, शिवडी क्रॉस रोड, दिनशॉ पेटीट रोड, सुबानराव नलावडे रोड-परळ, परमार गुरूजी रोड, महालक्ष्मी मंदिर रोड, सोफिया कॉलेज लेन-पेडर रोड, गावदेवी रोड-ताडदेव, नानू भाई देसाई रोड-गिरगाव.



हेही वाचा -

मुंबई महापालिकेच्या तिजोरीत १२ हजार कोटींची भर, पैसे खर्च करायचे कुठं? महापालिकेला प्रश्न

एसबीआयचे कर्ज आणखी स्वस्त, सलग पाचव्यांदा व्याजदरात कपात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा