Advertisement

महापालिकेच्या रुग्णालयांवर अग्निशमन दलाचाच विश्वास नाही!

मुंबईसह राज्य आणि देशभरातून अनेक रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या उत्तम आरोग्य सेवेमुळे या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. परंतु महापालिकेच्या या रुग्णालयांवर स्वत:चाच विश्वास नसून अग्निशमन दलाच्या जवानांची वार्षिक वैद्यकीय तपासणी खासगी रुग्णालयांमध्ये करण्यासाठी ५० लाखांचा खर्च करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांवर अग्निशमन दलाचाच विश्वास नाही!
SHARES

मुंबई महापालिकेची ४ प्रमुख रुग्णालये, १७ उपनगरीय रुग्णालये तसंच एक विशेष रुग्णालय यासह दवाखाने, प्रसुतीगृह आदींच्या माध्यमातून आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. मुंबईसह राज्य आणि देशभरातून अनेक रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या उत्तम आरोग्य सेवेमुळे या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. परंतु महापालिकेच्या या रुग्णालयांवर स्वत:चाच विश्वास नसून अग्निशमन दलाच्या जवानांची वार्षिक वैद्यकीय तपासणी खासगी रुग्णालयांमध्ये करण्यासाठी ५० लाखांचा खर्च करण्यात येणार आहे.


तपासणी अपोलो क्लिनिकमध्ये

मुंबई अग्निशमन दलातील ४५ वर्षे पूर्ण झालेल्या दलातील अधिकारी व कर्मचारी यांची महापालिकेच्या नायर, केईएम, शीव आणि कूपर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येते. परंतु आता या जवान व अधिकाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी ही अपोलो क्लिनिकमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक वैद्यकीय तपासणीसाठी सरासरी ३५०० रुपये खर्च केले जाणार आहे. त्यामुळे सन २०१८ मध्ये ४९ लाख ५० हजार रुपये, सन २०१९मध्ये ५७ लाख ६० हजार आणि सन २०२० मध्ये ६६ लाख ३० हजार एवढा वार्षिक खर्च जवान व अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीवर केला जाणार आहे.


सत्यशोधन समितीच्या शिफारशींनुसार

काळबादेवी येथील झालेल्या आगीच्या दुघर्टनेची कारणमिमांसा तपासण्याकरीता स्थापन करण्यात आलेल्या सत्यशोधन समितीने केलेल्या शिफारशीनुसार मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रत्येक वर्षी वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार २०१५ पासून दलातील ज्या जवान व अधिकारी यांची वयाची ४५ वर्षे पूर्ण झालेली आहे अशांची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येत आहे. मात्र, महापालिका रुग्णालयात या वैद्यकीय तपासणी पूर्ण होण्यासाठी जवळ जवळ ७ ते ८ महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे कर्तव्यावर असताना त्यांना पाठवणं शक्य होत नाही.


तपासणीला वर्षभर

तर पुढील २०१६ मध्ये जवळ जवळ १५०० अधिकारी व जवानांची तपासणी व्हायला वर्षभराला वेळ लागला. त्याठिकाणी असलेल्या गर्दीमुळे वेळेत वैद्यकीय तपासणी केली जात नाही. त्यामुळे अग्निशमन दलाच्या कामावर परिणाम होत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये ही तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याचं अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी स्पष्ट केलं.


आॅनड्युटी तपासणी अशक्य

अग्निशमन दलातील जवान व अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांची ऑनड्युटी तपासणी करता येत नसल्याने विशेष बाब म्हणून अशाप्रकारे अपोलाे क्लिनिकमध्ये वार्षिक तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सनदी अधिकाऱ्यांसह काही मोठ्या अधिकाऱ्यांची विशेष बाब म्हणून वैद्यकीय तपासणी केली जाते,त्याचधर्तीवर या सर्वांची तपासणी करता येवू शकते, असं प्रभात रहांगदळे यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

नव्या कोऱ्या ४० गाड्या पालिकेच्या गॅरेजमध्ये धुळखात!

आस्थापना विभागाची महाचूक : महापालिका कर्मचारी गटविमा, पेन्शनपासून वंचित



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा