Advertisement

मालकांनो, कुत्र्याची 'शी' उचला, नाहीतर भरावा लागेल दंड

रस्त्यावर शौच करणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांनी ही घाण साफ करावी, असा आदेश महापालिका प्रशासनाने दिला अाहे. त्यानुसार सार्वजनिक कुत्रामालकाला फिरताना कुत्र्यासोबत 'पूप स्कूपर' (विष्ठा उचलण्याचं साधन) ठेवावं लागणार आहे. ते नसल्यास आणि कुत्र्याने रस्त्यावर शौच केल्यास ती विष्ठा कुत्र्याच्या मालकाला उचलावी लागेल. तसं न केल्यास ५०० रुपये दंड भरण्यासाठी तयारी ठेवावी लागेल.

मालकांनो, कुत्र्याची 'शी' उचला, नाहीतर भरावा लागेल दंड
SHARES

सकाळी वा सायंकाळी आपल्या लाडक्या कुत्र्याला घेऊन बाहेर फेरफटका मारण्याची हौस अनेकांना असते. पण असं करताना तुमच्या कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी शौच केल्यास ती 'शी' त्वरीत उचलण्याचीही तयारी ठेवा. कारण तसं न केल्यास मुंबई महापालिकेकडून तुम्हाला ५०० रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. यासंदर्भातील कडक अंमलबजावणीला सोमवारपासून डी वाॅर्डपासून सुरूवात करण्यात आली आहे.

स्वच्छतेसोबत आरोग्याचा प्रश्न

सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, फूटपाथवर कुत्रे मालक आपल्या कुत्र्यांना फिरायला घेऊन येतात. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्याने शौच केल्यावर केवळ स्वच्छतेचाच नाही, तर आरोग्याचाही प्रश्न उद्भवू शकतो. याची जाणीव या कुत्र्यांच्या मालकांना नसल्याने महापालिकेने त्यांना धडा शिकवण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. असं करत थुंकीबहाद्दर, रस्त्यावर शौच किंवा लघुशंका करणारे तसंच कचरा टाकणाऱ्यांच्या पाठोपाठ कुत्र्यांच्या शौचावरही महापालिकेने प्रतिबंध घातला आहे.

'पूप स्कूपर' ठेवावा लागेल

रस्त्यावर शौच करणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांनी ही घाण साफ करावी, असा आदेश महापालिका प्रशासनाने दिला अाहे. त्यानुसार सार्वजनिक कुत्रामालकाला फिरताना कुत्र्यासोबत 'पूप स्कूपर' (विष्ठा उचलण्याचं साधन) ठेवावं लागणार आहे. ते नसल्यास आणि कुत्र्याने रस्त्यावर शौच केल्यास ती विष्ठा कुत्र्याच्या मालकाला उचलावी लागेल. तसं न केल्यास ५०० रुपये दंड भरण्यासाठी तयारी ठेवावी लागेल.

'इथून' येत होत्या तक्रारी

मरिन ड्राइव्ह, गिरगाव, मलबार हिल आणि उपनगरातून यासंदर्भात वारंवार तक्रारी येत असल्याने मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत हे आदेश दिले. मुंबई महापालिकेच्या २००६ मधील नियमानुसार याप्रकरणी ५०० रुपये दंड करण्याची तरतूद आहे. परंतु अनेकदा कुत्री मालकाशिवाय बाहेर जात असल्याने महापालिकेला कारवाई करण्यास अडचण येत होती. परंतु अाता महापालिकेने यासंदर्भात कडक धोरण अवलंबण्याचं ठरवलं आहे.हेही वाचा-

मुंबईतील पार्किंगची सोडवणार 'पार्किंग अॅथाॅरिटी'

मुंबई एअरपोर्टने मोडला स्वत:चाच विक्रम!Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा